Sharad Pawar Exclusive: 'अजितदादा आणि तुम्ही एकत्र येणार?', पवार म्हणाले त्यांना पुन्हा...

साहिल जोशी

ADVERTISEMENT

अजित पवारांना एकत्र घेण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?
अजित पवारांना एकत्र घेण्याबाबत शरद पवार काय म्हणाले?
social share
google news

Sharad Pawar Statement on Ajit Pawar: साहिल जोशी / राजदीप सरदेसाई, बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये बारामती मतदारसंघात अटीतटीची लढाई आहे. आतापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे की, ज्यावेळेस अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात उघडउघड भूमिका घेत थेट आपल्या पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 2019 साली पहाटेच्या शपथविधीनंतरही शरद पवारांनी अजित पवारांना माफ करत पुन्हा पक्षात घेतलं होतं. मात्र, आता तशीच वेळ आली तर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का? यावर स्वत: पवारांनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. (lok sabha election 2024 sharad pawar mumbai tak exclusive interview We will not take ajit pawar or those who went with him again said sharad pawar )

ADVERTISEMENT

मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवार यांनी सध्याची राजकीय परिस्थितीवर बरंच भाष्य केलं. पण याच मुलाखतीत जेव्हा त्यांना अजित पवार यांना पुन्हा आपल्याकडे घेणार का? तुम्ही एकत्र येणार का? असा सवाल जेव्हा विचारण्यात आला तेव्हा ते नेमकं काय म्हणाले तेच आपण पाहूयात.

अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार?

प्रश्न: या निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? मोहिते-पाटील भाजपसोबत गेले होते ते परत आले.. लंके अजित पवारांसोबत गेले होते ते परत आले.. हीच शक्यता अजित पवार, वळसे-पाटील आणि प्रफुल पटेलांबाबत आहे का? 

हे वाचलं का?

शरद पवार: साधी गोष्ट आहे की, ज्यांना पक्षाने संधी दिली, प्रतिष्ठा दिली... ते लोकं पक्षाची विचारसरणी, हे सगळं सोडून गेले. भाजपसारख्या शक्तीशी ज्यांनी हातमिळवणी केली.. अशांना आमच्याकडे जागा नाही..  

असं म्हणत शरद पवार यांनी यापुढे राजकीयदृष्ट्या अजित पवार यांच्यासोबत एकत्र येणार नसल्याचं सांगितलं आहे.

हे ही वाचा>> 'जे बाळासाहेबांनी दिलं ते मीही..', पवारांची खणखणीत मुलाखत

याच मुलाखतीत शरद पवार यांना असाही सवाल विचारण्यात आला की, 'ज्यांना तुम्ही मोठं केलं.. म्हणजे अजित पवार.. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे..' 

ADVERTISEMENT

यावेळी शरद पवारांनी कोणतेही आरोप न करता अत्यंत थेटपणे उत्तर देताना म्हटलं की, 'असं नाही.. अजित पवारच नाही.. जे लोकं माझ्या पक्षाचे, संघटनेचे लोक 30-40 आमदार किंवा इतर आमच्या संघटनेच्या, पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या नावाने निवडून आले.. ज्यांच्यासाठी मी कष्ट घेतले.. आज ते सगळे या-ना त्या कारणाने निघून जातात याची मला अस्वस्थतता आहे. पण मला त्याची चिंता नाही.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> सिंचन घोटाळ्याची केस, शाहांच्या 'त्या' विधानाने मोठी खळबळ!

वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार हे स्वत: राज्यभर फिरून आपल्या पक्षासाठी लढत आहे. शरद पवारांचा हाच झंझावात विरोधक आणि विशेषत: अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा रोखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT