पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, चिमुरडीचे इवले हात लिफ्टच्या दारात अडकले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

मुंबई तक

Pune : पुण्यातील दिघीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका चिमुरडीचा हात निष्काळजीपणामुळे लिफ्टच्या दारात अडकला. सुदैवाने, तिला वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. या संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, महिला तिच्या बाळाला लिफ्टमध्ये घेऊन जात होती. तेव्हा लिफ्टमध्ये इतर काही लोक होते, लिफ्टचा दरवाजा बंद होत असतानाच, चिमुरडीने तिचा हात दरवाजावर ठेवल्याने तिचा हात अडकून बसला. 

ADVERTISEMENT

 Pune News
Pune News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चिमुरडीचा हात लिफ्टमध्ये अडकला

point

घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Pune News : पुण्यातील दिघीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका चिमुरडीचा हात निष्काळजीपणामुळे लिफ्टच्या दारात अडकला. सुदैवाने, तिला वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. या संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, महिला तिच्या बाळाला लिफ्टमध्ये घेऊन जात होती. तेव्हा लिफ्टमध्ये इतर काही लोक होते, लिफ्टचा दरवाजा बंद होत असतानाच, चिमुरडीने तिचा हात दरवाजावर ठेवल्याने तिचा हात अडकून बसला. 

हे ही वाचा : मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, 29 वर्षांपूर्वीचा त्रास उद्भवल्याने शस्त्रक्रिया

चिमुरडीचा हात लिफ्टमध्ये अडकला

जेव्हा लिफ्ट एका ठिकाणी पोहोचली असता, दरवाजा उघडण्यात आला आणि नंतर बंद झाला, त्याचदरम्यान चिमुरडीचा हात लिफ्टच्या दरवाजात अडकला होता. लिफ्टमधील सर्वजण घाबरून गेले होते. सर्वांनी चिमुरडीचा हात सोडवण्याचा अधिक प्रयत्न देखील केला होता, पण तो सहजासहजी बाहेर आला नाही. काही मिनिटांच्या संघर्षानंतर मुलीचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. उपस्थितांनी सर्वांना सुटकेचा नि: श्वास सोडला. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. 

घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने मुलीला दुखापत झाली नाही. काही मिनिटांसाठी परिस्थिती भयावह होती. संपूर्ण घटनेचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. 

हे ही वाचा : बीड : परळीत 16 वर्षीय मुलीला गोड बोलून बंद दाराआड नको तेच... कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लहान मुलांची किती काळजी घेणं महत्त्वाचे आहे हे गरजेचे आहे. दरम्यान, मुलांना लिफ्ट, बटणांपासून दुरच ठेवावं, कारण यामुळे थोडासा निष्काळजीपणा जीवनाशी येईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp