पालघरमध्ये पोलिसांच्या भीतीपोटी तरुण धावू लागले, मालगाडीने दिली धडक अन् तिघांचा करुण अंत

मुंबई तक

Palghar accident : पालघरमध्ये एका मालगाडीला धडकून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या भीतीपोटी तरुण पळू लागले होते, त्यानंतर ते एका मालगाडीला धडकले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेनं संपूर्ण पालघर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज 14 मार्च रोजी पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली असून मृतांची तरुणांची नावे समोर आली आहेत.

ADVERTISEMENT

Palghar accident
Palghar accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघरमध्ये तीन तरुणांचा मालगाडीला धडकून दुर्दैवी मृत्यू

point

घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Palghar accident - मोहम्मद हुसैन खान : पालघरमध्ये एका मालगाडीला धडकून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या भीतीपोटी तरुण पळू लागले होते, त्यानंतर ते एका मालगाडीला धडकले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेनं संपूर्ण पालघर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज 14 मार्च रोजी पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली असून मृतांची तरुणांची नावे समोर आली आहेत. स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख अशी मृतांची नावे समोर आली आहेत. 

हे ही वाचा : आईने पाच महिन्यांच्या बाळावर फरशीने हल्ला करत डोकं फोडलं, नंतर मृतदेह स्वयंपाकघरात पुरला

पालघरमध्ये तीन तरुणांचा मालगाडीला धडकून दुर्दैवी मृत्यू

घडलेल्या घटनेनुसार, ही दुर्दैवी घटना जैन मंदिराजवळ घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या भीतीने तरुण पळत होते, त्याचदरम्यान रेल्वे रुळावरून जाताना वेगाने येणाऱ्या मालगाडीने तरुणांना धडक दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. संबंधित घटनेची माहिती समोर येताच, या प्रकरणाचा  पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश

या एकूण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपास सुरु केला. तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी नातेवाईकांचे आरोप ऐकूण घेतले. तसेच 'तपास पूर्ण झाल्यावरच अपघाताचे खरे कारण आणि परिस्थिती स्पष्ट होईल',अशी भूमिका घेतली जाणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp