बीड : ऊसाच्या फडात वयोवृद्ध वारकऱ्याचा जळालेला मृतदेह आढळला, आत्महत्येचा संशय; नेमकं काय घडलं?
Beed Crime : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ऊसाच्या फडात वयोवृद्ध वारकऱ्याचा जळालेला मृतदेह आढळला
आत्महत्येचा संशय
नेमकं काय घडलं?
Beed Crime, रोहिदास हातागळे : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ऊसाच्या सरीत सापडला मृतदेह
ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
टीबीमुळे मानसिक तणावात
मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित (M.A.) होते आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते टीबी (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे ते मानसिक तणावात असल्याची चर्चा गावात आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.










