पुण्यात टक-टक गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेने पुण्यातील टक-टक गँगचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही टक-टक गँग काय आहे आणि ती नेमकी काय करायची, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात टक-टक गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

point

नेमकं प्रकरण काय?

Pune Crime : पुणे शहरात सिग्नलवर वाहनचालकांचे लक्ष विचलित करून मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या ‘टक-टक गँग’चा पर्दाफाश करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी शहरातील अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-1 पथकाने ही कारवाई केली. आरोपी सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनाजवळ जाऊन काचेवर टक-टक करत चालकाचे लक्ष वेधत असत. वाहनाने धडक दिल्याचा बहाणा करून चालकासोबत वाद घालताना त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले जात असे. याच दरम्यान कारमधील मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा : मुंबई : 'मासे तू खाल्लेस की उंदराने..' दगडाने ठेचून मित्रांनी केली हत्या; 50 कचरा वेचकांच्या चौकशीतून भयंकर गुन्ह्याचा उलगडा

सापळा रचून अटक

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रविवारी ओमप्रकाश कोहली (वय 38) आणि अफझल कय्युम अब्बासी (वय 38) अशी असून ते दोघेही मेरठ येथील रहिवासी आहेत.

गुन्ह्याची कबुली 

चौकशीदरम्यान त्यांनी फरासखाना परिसरातील मोबाईल चोरीची कबुली दिली. तसेच कर्वे रोड परिसरात उभी असलेल्या कारमधून आयफोन आणि रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय विमाननगर चौकात कारचालकाला 'गाडी पायावर गेली' असा बहाणा करून सॅमसंग व वनप्लस कंपनीचे मोबाईल चोरल्याचीही माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp