बाजारात सोडतो म्हणून बाईकवर बसवलं, नवविवाहितेसोबत बंटीने केलं भयंकर कृत्य; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 03:59 PM • 19 Feb 2026

Crime News : एका 22 वर्षीयजनक विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडिता घरातून बाजारला जाण्यासाठी निघाली होती. वाटेत तिला बंटी उर्फ संजीव नावाचा एक इसम भेटला. त्याने तिला बाजारात सोडतो असे सांगितले. मात्र पुढं काय होणार आहे याची पीडितेला कल्पनाच नव्हती. बंटीनं नेमकं काय केलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाजारात सोडतो म्हणून बाईकवर बसवलं

point

नवविवाहितेसोबत बंटीने केलं भयंकर कृत्य

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका 22 वर्षीयजनक विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडिता घरातून बाजारला जाण्यासाठी निघाली होती. वाटेत तिला बंटी उर्फ संजीव नावाचा एक इसम भेटला. त्याने तिला बाजारात सोडतो असे सांगितले. मात्र पुढं काय होणार आहे याची पीडितेला कल्पनाच नव्हती. बंटीनं नेमकं काय केलं, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : क्रीडा विश्वावर शोककळा, सामना सुरु असतानाच अंपायरचा दुर्दैवी अंत, अनेक खेळाडू जखमी

बाजारात जाण्यासाठी निघाली, पण...

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरातून बाजारला जाण्यासाठी निघाली होती. गावच्या बाहेर रोडवर आरोपी बंटी ऊर्फ संजीव अहिरवार तिला भेटला. त्याने तिला बाजारात सोडण्याचे अमिष दाखवून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. महिलेने विरोध केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुचाकी झाशीच्या दिशेने वळवली. आरोपीच्या धमक्यांमुळे पीडिता हतबल झाली होती.

हॉटेलच्या खोलीत अत्याचार

आरोपीने पीडितेला झाशी बसस्थानकावरून बसने गुना येथे नेले. तेथील एका हॉटेलमध्ये तिला डांबून ठेवून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तसेच या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची आणि कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तिचा छळ केला. काही दिवसांनंतर संधी मिळताच पीडितेने तेथून पळ काढला आणि बसने दतिया गाठले. सुरुवातीला भीतीपोटी तिने काही सांगितले नाही, मात्र आरोपीने पुन्हा धमकावणे सुरू केल्याने तिने कुटुंबाला आपबिती सांगितली.

हे ही वाचा : पुरुषासारखी चाल आणि बुटांमुळे उलगडलं सत्य, मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यातून बुरखा परिधान करणारा पुरुष ताब्यात

आरोपीचा शोध सुरु

बुधवारी रात्री पीडितेने चिरुला पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणाबाबत माहिती देताना ठाणे प्रभारी नितीन भार्गव यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बलात्कार, मारहाण, शिवीगाळ आणि धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले असून, फरार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.