Baramati: 'अजितदादामुळे आई चक्क गाव सोडून पुण्याला..', श्रीनिवास पवारांनी मोठ्या भावाला सुनावलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

श्रीनिवास पवारांनी मोठ्या भावाला सुनावलं!
श्रीनिवास पवारांनी मोठ्या भावाला सुनावलं!
social share
google news

Baramati Ajit Pawar vs Shrinivas Pawar Pawar: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वांचं लक्ष हे महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. कारण या मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये कौटुंबिक पातळीवर अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबाला एकही व्यक्ती मदत करत नसल्याचं दिसतं आहे. किंबहुना अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवारांच्या निर्णयामुळे खूपच नाराज आहे. पण त्याशिवाय या सगळ्या राजकारणामुळे अजित पवारांच्या आई देखील नाराज झाल्याचं आता समोर आलं आहे. (lok sabha election 2024 baramati because of ajit dada my mother left the village and went to live with my sister in pune shrinivas pawar criticizes ajit pawar)

ADVERTISEMENT

अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, 'बारामतीत जे राजकारण सुरू आहे ते आईला आवडलेलं नाही.. म्हणून ती चक्क गाव सोडून पुण्यात राहायला गेली आहे.'

हे ही वाचा>> 'आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाकरेंनी त्यांची प्रॉपर्टी विचारली'

'आईलाही ते आवडलं नाही म्हणून ती...', पाहा श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले

अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याचा आणि सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या निर्णयाबद्दल कुटुंबीयांना काय वाटतं याविषयी श्रीनिवास पवार यांनी त्यांची मतं स्पष्टपणे सांगितलं. 

हे वाचलं का?

'आईला ते आवडत नाही किंवा आवडत नव्हतं. पण ती दोन्ही बाजूला.. एका बाजूला मुलगा आणि एका बाजूला दीर आहे.. त्यामुळे तिने दोन्ही बाजूला काही करायचं नाही असं ठरवलं. त्यामुळे ती चक्क गाव सोडून पुण्यात राहिलीए. माझ्या बहिणीकडे.. ती म्हणाली मला दोघांमध्ये पडायचं नाही..' 

'दीर पण मला तेवढेच प्रिय आहेत आणि माझा मुलगा पण मला तेवढाच प्रिय आहे. त्यामुळे तिने कोणतीच बाजू घेतली नाही.' 

'प्रत्येकाने त्याच्याशी चर्चा केली. पण आता त्याने ठरवलंय.. पण ठीकए.. मग आमच्यातले काही जणं.. जे नेहमी प्रचाराला येतो आम्ही ठरवलं की, सुप्रियाला आपण साथ दिली पाहिजे. साहेबांनी जे काही कुटुंबासाठी, बारामतीकरांसाठी, महाराष्ट्रकरांसाठी केलेलं आहे त्याचं आपण काही तरी देणं लागतो.. कोणत्याही पक्षाचे नसलो तरीही..'

हे ही वाचा>> तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द

'म्हणून माझ्या कुटुंबाने ठरवलं की, आपण झोकून दिलं पाहिजे. बारामतीकर हे सुज्ञ आहेत. ते बरोबर योग्य निर्णय घेतील.' 

ADVERTISEMENT

'शरद पवार भावनिक होऊन काही करणार नाहीत. पण हाच भावनिक होऊ नका म्हणतोय आणि स्वत: भावनिक होतोय..' 

ADVERTISEMENT

'दादाला सुद्धा साहेबांनीच मोठं केलं. असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. ठीकए परिस्थिती बदलत जाते.. निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य साहेबांनी दादाला दिलं होतं.' असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT