मुंबईची खबर: अखेर, UTS अॅप सेवाबंद... आता तिकीट बुकिंगसाठी 'हे' नवं सुपर अॅप अनिवार्य
1 मार्चपासून UTS अॅप प्रवाशांसाठी कायमचं बंद होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता काही दिवसांतच, या अॅपच्या सर्व सेवा बंद होतील आणि त्याऐवजी प्रवाशांना आता वेगळा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईकरांसाठी UTS अॅप सेवाबंद...
आता तिकीट बुकिंगसाठी 'हे' नवं सुपर अॅप अनिवार्य
Mumbai News: मुंबईकर मागील बऱ्याच वर्षापासून लोकल तिकीट बूक करण्यासाठी यूटीएस (UTS) अॅपचा वापर करत आहेत. या अॅपच्या माध्यमातून लोकल तिकीट, पास आणि अनरिझर्व्हड तिकीट बूक करणं प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर होतं. मात्र, 1 मार्चपासून हे अॅप प्रवाशांसाठी कायमचं बंद होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता काही दिवसांतच, या अॅपच्या सर्व सेवा बंद होतील आणि त्याऐवजी प्रवाशांना आता वेगळा पर्याय उपलब्ध होणार आहे.
लोकल तिकीट बूक करण्यासाठी उत्तम पर्याय
इंडियन रेल्वेने 27 डिसेंबर 2014 रोजी UTS (अनरिझर्व्ड तिकीट सिस्टिम) अॅप लॉन्च केलं होतं. सुरुवातीला, हे अॅप केवळ इंडियन रेल्वेसाठी होतं, पण कालांतराने ते सर्व शहरांमध्ये उपलब्ध करण्यात आलं. मुंबईकरांसाठी लोकल तिकीट बूक करण्यासाठी हा उत्तम पर्याय होता. मात्र, आता हे अॅप कायमचं बंद करण्यात येणार असून प्रवाशांसाठी आता 'RailOne' हे नवं अॅप उपलब्ध होणार आहे. सध्या, महिन्याभरापासून RailOne वर पास बुकिंग सुरू झालं असून 1 मार्चपासून तिकीट किंवा पास बुक करण्यासाठी हा एकमेव पर्याय असेल.
हे ही वाचा: Govt Job: 12 वी पास उमेदवारांसाठी आधार सेवा केंद्रात मोठी भरती! कधीपर्यंत अन् कसं कराल अप्लाय?
सर्व प्रकारची तिकिटे एकाच अॅपवर
जुलै 2025 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'RailOne' अॅप लॉन्च केलं होतं. 'सेंटर ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम'च्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. सुरुवातीला 'RailOne' हे आरक्षित म्हणजेच रिझर्व्हड तिकिट बुकिंगसाठी सुरू करण्यात आलं होतं. लांब पल्ल्याच्या रेल्वे तिकिटांसाठी हा एक उत्तम पर्याय होता. आता, प्रवाशांना या अॅपद्वारे आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही प्रकारची तिकीटे बुक करणं सोपं जाईल. वेगवेगळे अॅप्स वापरण्याऐवजी, आता सर्व प्रकारची तिकिटे एकाच ठिकाणी बुक करता येतील.
हे ही वाचा: "तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून सोडून जातो..." सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप, DNA चाचणीची मागणी
बुकींगसह इतर पर्यायसुद्धा उपलब्ध...
या नव्या RailOne अॅपवर तिकीट बुकींगसह इतर पर्यायसुद्धा उपलब्ध असतील. या अॅपच्या माध्यमातून ट्रेनचं लाइव्ह लोकेशन, कोच स्टेटस, प्लॅटफॉर्मची माहिती, तिकीट कॅन्सलेशन आणि PNR ट्रॅक करणं सोपं होईल. प्रवासी RailMadad अॅपद्वारे तक्रारी देखील नोंदवू शकतात. याव्यरिक्त, ते प्रवासादरम्यान IRCTC च्या अधिकृत विक्रेत्यांकडून जेवण किंवा खाण्याचे पदार्थ देखील ऑर्डर करू शकतात.










