Eknath Shinde : 'आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाकरेंनी त्यांची प्रॉपर्टी विचारली', CM शिंदेंचा गंभीर आरोप
Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बरेच फोन केले, पण तुम्ही उचलले नाहीत, इतका कृतघ्न माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली. पण आता खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिल्याबद्दल मोदी आणि अमित शाह यांचे मुख्यमंत्री शिंदेंनी आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : धर्मवीर आनंद दिघे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मी भेटलो होतो. या भेटी दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे मला आनंद दिघे यांची प्रॉपर्टी विचारली होती, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ना धनुष्यबाण पाहिजे ना बाळासाहेबांचे विचार, त्यांना फक्त पैसा पाहिले असा हल्लाबोल देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केला होता. (eknath shinde criticize uddhav thackeray thane lok sabha 2024 naresh mhaske candidate rajan vichare)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बरेच फोन केले, पण तुम्ही उचलले नाहीत, इतका कृतघ्न माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली. पण आता खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिल्याबद्दल मोदी आणि अमित शाह यांचे मुख्यमंत्री शिंदेंनी आभार मानले आहेत.
हे ही वाचा : 'लोकसभेनंतर महाराष्ट्रातील 2 पक्ष...', चव्हाणांच्या विधानाने खळबळ
भाजपला घाबरवून 25 ते 30 आमदार फोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. मी त्यांच्या मंत्रिमंडळात असताना एका खोट्या गुन्ह्यात नाव गोवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण जर त्यांचा प्लॅन सक्सेस झालास असता तर माझा प्लॅन फेल झाला असता, असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. तसेच शिंदे यांनी यावेळी मनसेचे तोंडभरून कौतुक केले. मनसेचे लोक दीलसे कामाला लागले आहेत. आणि राज ठाकरे हे कोत्या मनाचे नाही तर मोठ्या मनाचे माणूस आहेत, असे कौतुक शिंदेंनी राज ठाकरेंचे केले आहे.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी संविधानावरही भाष्य केले. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान काँग्रेसने केला.बाबासाहेब आंबेडकरांना पाडायच काम काँग्रेसने केले. पण जबतक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब आंबेडकर का संविधान रहेगा, असे प्रत्युत्तर शिंदेंनी विरोधकांना दिले.
हे ही वाचा : ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झाले आहे. त्यामुळे मतांचा टक्का वाढवा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांना केले आहे. तसेच पहिल्या टप्प्याच्या मतदानात महायुती प्रचंड बहुमताने जिंकणार आहे, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT