Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून संपवलं
Pune Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर तिला खडी मशीन चौकाजवळील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला काठीने मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत वरून ढकलून दिले, असा आरोप आहे. या क्रूर कृत्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यातील धक्कादायक घटना
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून संपवलं
Pune Crime News, पुणे : भारतीय विद्यापीठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे तपास करत सहा आरोपी निष्पन्न केले आहेत. यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर तिला खडी मशीन चौकाजवळील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला काठीने मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत वरून ढकलून दिले, असा आरोप आहे. या क्रूर कृत्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील सहा आरोपींची ओळख पटवली. यापैकी दोन आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात यश आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा : "तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून सोडून जातो..." सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप, DNA चाचणीची मागणी










