नऊ वर्षांपूर्वी 16 वर्षाच्या मुलीला दिलेला फ्लाईंग किस, आता आरोपीला 3 वर्षांची शिक्षा! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai High Court : ही घटना 31 जानेवारी 2017 रोजीची आहे. परिसरात हळदी-कुंकू कार्यक्रम सुरू असताना आरोपीने मुलीकडे पाहत ‘फ्लाइंग किस’चा इशारा केला. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने ही बाब पाहिली आणि मुलीच्या आईला सांगितली. आईने मुलीला विचारले असता, काही दिवसांपूर्वी ट्युशनला जात असताना हा प्रकार घडला होता.

Bombay High Court

Bombay High Court

मुंबई तक

19 Feb 2026 (अपडेटेड: 19 Feb 2026, 04:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नऊ वर्षांपूर्वी 16 वर्षाच्या मुलीला दिलेला फ्लाईंग किस

point

आता आरोपीला 3 वर्षांची शिक्षा! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai High Court : मुंबईतील विशेष न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या स्टॉकिंग आणि ‘फ्लाइंग किस’ प्रकरणात एका व्यक्तीला दोषी ठरवले आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी 16 वर्षांची होती, तर आरोपी 19 वर्षांचा होता. सध्या आरोपी विवाहित असून त्याला तीन महिन्यांचे बाळ आहे. न्यायालयाने त्याला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली असून 3 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हे वाचलं का?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना 31 जानेवारी 2017 रोजीची आहे. परिसरात हळदी-कुंकू कार्यक्रम सुरू असताना आरोपीने मुलीकडे पाहत ‘फ्लाइंग किस’चा इशारा केला. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने ही बाब पाहिली आणि मुलीच्या आईला सांगितली. आईने मुलीला विचारले असता, काही दिवसांपूर्वी ट्युशनला जात असताना आरोपीने मागून येऊन तिचा हात पकडून स्वतःकडे ओढल्याचे मुलीने सांगितले. भीतीपोटी तिने ही गोष्ट आधी आई-वडिलांना सांगितली नव्हती.

फेब्रुवारी 2017 च्या मध्यात कुटुंबाला संपूर्ण प्रकार समजला. मुलीच्या वडिलांनी आरोपी व त्याच्या आईला बोलावून मुलीपासून दूर राहण्याची ताकीद दिली. मात्र, आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी उलट शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

हेही वाचा : अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या मुलीला आईची जात अन् आडनाव लावण्यास परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

न्यायालयातील सुनावणी

सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील संतोष पगारे यांनी असा दावा केला की, आरोपी नाचताना ‘फ्लाइंग किस’सारखा इशारा करत होता. मात्र, मुलीने हा दावा फेटाळून लावला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, या युक्तिवादातून आरोपीने अप्रत्यक्षपणे ‘फ्लाइंग किस’ केल्याचे मान्य केल्याचे दिसते. असा इशारा हा लैंगिक स्वरूपाचा असून तो पीडितेच्या सन्मानाचे उल्लंघन करणारा आणि लैंगिक छळाच्या स्वरूपात मोडणारा आहे. आरोपीने असा बचावही केला की, शेजारील महिला त्याची नातेवाईक असून दोन्ही कुटुंबांमध्ये जुनी वैरभावना आहे. मात्र, न्यायाधीशांनी नमूद केले की, पीडित मुलगी किंवा तिच्या पालकांचा आरोपीच्या कुटुंबाशी कोणताही वैरभाव नव्हता. स्वतःच्या मुलीच्या सन्मानाशी खेळ करून खोटा गुन्हा दाखल करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाचा निर्णय

सर्व पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा आणि 3 हजार रुपयांचा दंड सुनावला. या निर्णयाविरोधात अपील करण्यात येईल का, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी हा निकाल मुलींच्या सुरक्षेबाबत आणि अशा तथाकथित ‘लहान’ वाटणाऱ्या हावभावांनाही गांभीर्याने घेण्याचा स्पष्ट संदेश देणारा ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 


पुरुषासारखी चाल आणि बुटांमुळे उलगडलं सत्य, मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यातून बुरखा परिधान करणारा पुरुष ताब्यात

    follow whatsapp