Mumbai News : नाशिकमधील एका 57 वर्षीय पुरुषाने बुरखा घालून मुंबई लोकल ट्रेनच्या माहिला डाब्यातून प्रवास केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडली. दुसऱ्याच दिवशी, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे सरकारी रेल्वे पोलिसांनी स्वत:हून चौकशी सुरु केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "...भाऊ पळवला", राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
कोणत्याही महिला प्रवाशाने औपचारिकता तक्रार दाखल केली नसली तरी, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जीआरपीने सखोल चौकशी केली. दरम्यान आरोपीचे नाव शेख अल्पाफ हुसैन इशाक असे नाव आहे. त्याला नाशिक येथून मुक्तिधाम परिसरात अटक केली.
तपासादरम्यान, पोलिसांनी घाटकोपर आणि ठाणे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. फुटेजमध्ये संशयित 6 फेब्रुवारी रोजी ठाणे स्थानकावर अप पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून उतरताना दिसत होता, त्यानंतर तो लोकल ट्रेनमध्ये चढला. पुढील तपासात इगपुरी आणि नाशिक रोड स्थानकांवरील कॅमेऱ्यांमध्ये त्याने बुरखा परिधान केलेला दिसत होता. नाशिक रोड स्थानकावरील त्याने बॅरिकेट्स ओलांडून उडी मारून जाताना व्हिडिओत दिसून आला.
हालचाल आणि बूटांवरून ओळख पटवली
पोलिसांनी 8 ते 17 फेब्रुवारी दरम्यान नाशिक शहरातील 25 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले. त्याच्या हालचालीतून विशिष्ट शैली आणि बूटांवर अखेर त्याची ओळख पटवण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता, फुटेजमध्ये दिसणारे बूट आणि बॅग दिसून आली होती.
हे ही वाचा : "ज्या कठीण प्रसंगात मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा डोळ्यासमोर..", सुनेत्रा पवार भाषणात काय म्हणाल्या?
मानसिक रुग्णालयात उपचार सुरु
कुटुंबातील सदस्यांनी त्याची ओळख पटवली, दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इशाक स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहे आणि संभाजीनगर येथील मानसिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या वैद्यकीय स्थितीमुळे तो अधूनमधून घराबाहेर फिरत असल्याचे वृत्त आहे. पोलीस सध्या या प्रकरणात कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्ण करत आहे.
ADVERTISEMENT











