मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट... मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल! कधीपासून होणार लागू?

मध्य रेल्वेने काही मेल/ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वेच्या या निर्णयानुसार, काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल!

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल!

मुंबई तक

• 01:58 PM • 19 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट...

point

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल!

point

कधीपासून नवं वेळापत्रक होणार लागू?

Mumbai News: मध्य रेल्वेने काही मेल/ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वेच्या या निर्णयानुसार, काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सुधारित वेळापत्रक 13 आणि 14 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. वाढत्या रेल्वे वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने या महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

'या' गाड्यांच्या वेळात बदल... 

मिळालेल्या माहितीनुसार, 22177 सीएसएमटी-बनारस महानगरी एक्सप्रेस आता सीएसएमटीहून 00:15 वाजता सुटेल आणि वाराणसीला 03:45 वाजता पोहोचेल. पूर्वी, ही ट्रेन 00:10 वाजता निघून 03:35 वाजता वाराणसीला पोहोचायची. 

ट्रेन क्रमांक 22178 बनारस-सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस वाराणसीहून 09:45 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 11:40 वाजता पोहोचेल. पूर्वी, ही गाडी वाराणसीहून 10:00 वाजता निघायची. 

त्याचप्रमाणे, 12111 सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून रात्री 20:05 ऐवजी 20:50 वाजता सुटेल. 

तसेच, ट्रेन क्रमांक 12289 सीएसएमटी - नागपूर दुरांतो एक्सप्रेस देखील 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून 20:35 वाजता सुटेल. पूर्वी ही गाडी 19:55 वाजता सुटायची. ट्रेन क्रमांक 12290 नागपूर - सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस 14 एप्रिलपासून सीएसएमटीला 07:50 वाजता पोहोचेल. पूर्वी ही ट्रेन 08:05 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. 

हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत पुन्हा 5000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...

गाडी क्रमांक 17318 दादर-हुबळी एक्सप्रेस दादरहून 20:05 वाजता निघेल. पूर्वी ती 20:15 वाजता निघायची. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 11301 सीएसएमटी-बेंगळुरू एक्सप्रेस देखील 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून 07:55 वाजता निघेल. पूर्वी ती 08:10 वाजता निघायची. 

तसेच, गाडी क्रमांक 22108 लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस 13 एप्रिलपासून सीएसएमटीला 8:00 वाजता पोहोचेल. पूर्वी ती 07:55 वाजता पोहोचायची. गाडी क्रमांक 12116 सोलापूर-सीएसएमटी एक्सप्रेस 06:30 वाजता पोहोचेल. पूर्वी ती 06:35 वाजता पोहोचायची. 

    follow whatsapp