Govt Job: 12 वी पास उमेदवारांसाठी आधार सेवा केंद्रात मोठी भरती! कधीपर्यंत अन् कसं कराल अप्लाय?

सीएसई- ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CSE-e-Governance Services India Limited) कडून आधार पर्यवेक्षक म्हणजेच आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

आधार सेवा केंद्रात मोठी भरती!

आधार सेवा केंद्रात मोठी भरती!

मुंबई तक

• 01:52 PM • 18 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

12 वी पास उमेदवारांसाठी आधार सेवा केंद्रात मोठी भरती!

point

कधीपर्यंत अन् कसं कराल अप्लाय?

Govt Job: चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत आधार सेवा आणखी विकसित करण्यासाठी, सीएसई- ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CSE-e-Governance Services India Limited) कडून आधार पर्यवेक्षक म्हणजेच आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातच राहून आधार सेवेत काम करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार csc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

या भरतीअंतर्गत, तब्बल 252 रिक्त पदे भरली जाणार असून 10 मार्च 2026 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे पूर्ण असणं अनिवार्य आहे. 

काय आहे पात्रता? 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा मॅट्रिक्युलेशन म्हणजेच 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत 2 वर्षांचा आयटीआय (ITI) कोर्स केलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 10  वी उत्तीर्ण आणि 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा असलेले विद्यार्थी देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवाराकडे UIDAI मान्यताप्राप्त चाचणी आणि सर्टिफाइंग एजन्सीचे आधार ऑपरेटर/ पर्यवेक्षक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. अटीनुसार, अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. तसेच, उमेदवार ज्या स्थानिक भाषेतून फॉर्मसाठी अर्ज करत आहे त्या भाषेचे ज्ञान त्याला असले पाहिजे. 

हे ही वाचा: "तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून सोडून जातो..." सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप, DNA चाचणीची मागणी

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम csc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
2. तिथे ASK Job Opening मध्ये तुम्हाला CSK e-Governance Services India Limited Invites applications for the post of Aadhaar Supervisor/ Operator अंतर्गत राज्यवार रिक्त जागा दिसतील. 
3. आता ज्या राज्यातून अप्लाय करायचं आहे, त्याच्यासमोरील 'Apply Now' लिंकवर क्लिक करा. 
4. त्यानंतर, अर्जात तुमची योग्य माहिती भरून दिलेल्या साइझमध्ये डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
5. शेवटी, कॅप्चा कोड भरून अर्ज सबमिट करा आणि फॉर्मची फायनल प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

भरतीसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार 'e-Governance Services India Limited'च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

    follow whatsapp