26/11 Mumbai Attack: करकरेंचा मृत्यू नेमका कोणाच्या गोळीमुळे? चार्जशीटमध्ये नेमकं काय?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

करकरेंचा मृत्यू नेमका कोणाच्या गोळीमुळे?
करकरेंचा मृत्यू नेमका कोणाच्या गोळीमुळे?
social share
google news

Hemant Karkare 26/11 Mumbai Attack: मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू हा दहशतवाद्यांच्या गोळीमुळे झाला नसून आरएसएसच्या संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. यासाठी त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आहे. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. (lok sabha election 2024 bjp candidate ujjwal nikam 26-11 mumbai attack whose bullet killed hemant karkare what exactly is in the charge sheet)

ADVERTISEMENT

त्यामुळे 26/11 ला नेमकं काय झालं होतं, कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे आपण सविस्तरपणे समजावून घेऊया.

26/11 च्या रात्री नेमकं काय घडलेलं?

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरिक्षक विजय साळसकर आणि आणखी दोन पोलिसांचा 26-11-2008 रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

हे वाचलं का?

या घटनेनंतर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटनुसार पाकिस्तानमधून 10 दहशतवादी हे स्पीडबोटने कराचीहून मुंबईला आले होते. मुंबईत दाखल होताच ते वेगवेगळ्या भागात पसरले. दोन दहशतवादी हे ट्रायडंट हॉटेलमध्ये गेले, 4 दहशतवादी हे ताज हॉटेलमध्ये तर दोन दहशतवादी हे नरीमन हाऊसमध्ये गेले.

हे ही वाचा>> 'आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाकरेंनी त्यांची प्रॉपर्टी विचारली'

कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनसमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर ते दोघे कामा हॉस्पिटलच्या दिशेने गेले. तिथे त्यांनी पोलिसांच्या टीमवर हल्ला केला, ज्यात आयपीएस अधिकारी सदानंद दाते आणि काही पोलीस जखमी झाले. 

ADVERTISEMENT

दाते आणि काही पोलीस जखमी झाल्याची माहिती करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वायरलेसवरुन मिळाली. त्यामुळे करकरे, कामटे आणि विजय साळसकर यांनी तात्काळ रंग भवनकडे जाणाऱ्या गल्लीतून कामा हॉस्पिटलच्या पुढच्या दारातून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

ADVERTISEMENT

या तीनही अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी सीएसटीजवळ सोडली आणि त्यांनी एसीपी शांतीलाल भामरे यांची क्वॉलिस जीप घेतली. त्यांच्यासोबत ड्रायव्हर बाळासाहेब भोसले, पोलीस कॉन्स्टेबल जयवंत पाटील, योगेश पाटील हे सोबत होते. ते महापालिका मार्गाने पुढे गेले, या सगळ्याबाबत भामरे यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता. पुढे काँन्सेटबल अरुण जाधव आणि जयवंत पाटील हे देखील त्यांच्यासोबत आले. याचवेळी त्याच गल्लीतून दहशतवादी विरुद्ध दिशेने येत होते. यावेळी झालेल्या गोळीबारात तीनही अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हेमंत करकरे यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या होत्या. खरं तर या अधिकाऱ्यांनी कामा रुग्णालयाच्या समोरच्या गेटमधून आत जाण्याचा निर्णय हा अचानक घेतला होता. पण त्याच मार्गाने दहशतवादी हे समोरासमोर येतील याबाबत त्यांना अंदाज नव्हता, असं राम प्रधान कमिशनच्या अहवालात आढळून आलं आहे.

हे ही वाचा>> उद्या मतदान... तुमच्या मतदारसंघात 'हे' आहेत उमेदवार!

या हल्ल्यातून वाचलेले काँन्स्टेबल अरुण जाधव यांच्या म्हणण्यानुसार ‘दहशतवादी कामा हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याबाबत आणि ते त्याच गल्लीत येत असल्याबाबत तीनही अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती. त्याचबरोबर क्वॉलिस घेऊन कामा हॉस्पिटलच्या गल्लीत जाण्याचा निर्णय देखील अचानक घेण्यात आला होता. दहशतवादी त्याच गल्लीतून येतील याबाबत अधिकाऱ्यांना कुठलाच अंदाज नव्हता. कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएममागे लपून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता', असं देखील जाधव यांनी त्यांच्या जबाबात नमूद केलं आहे.  

या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी क्वॉलिस आपल्या ताब्यात घेतली आणि ते मेट्रो जंक्शनच्या दिशेने गेले, तेथे त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अरुण चित्ते यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी मंत्रालयाजवळ क्वॉलिस सोडली आणि एक स्कोडा गाडी हायजॅक केली. स्कोडा गाडीने ते चौपाटीच्या दिशेने गेले जेथे एएसआय तुकाराम ओंबळे यांनी त्यांना थांबवलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अबू इस्माईल याचा मृत्यू झाला तर कसाबला ताब्यात घेताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आलं. 

कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्चशीटमध्ये या घटनाक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे. आता वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT