Pune ZP Election Result : पती ZP च्या गटातून विजयी, तर पत्नी पंचायत समितीच्या गणातून विजयी
Pune ZP Election Result 2026: भोरमधील भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम खुटवड यांनी विजय मिळवला आहे. तर भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड या विजयी झाल्या आहेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने दोन वेगवेगळ्या पदांवर यश मिळवल्याने भोरच्या राजकारणात या निकालाची विशेष चर्चा होत आहे. या विजयामुळे भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Pune ZP Election Result : पती ZP च्या गटातून विजयी,
तर पत्नी पंचायत समितीच्या गणातून विजयी
Pune ZP Election Results 2026 पुणे : भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले असून पती-पत्नीने निवडणुकीत बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी ठरले आहेत.
भोरमधील भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम खुटवड यांनी विजय मिळवला आहे. तर भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड या विजयी झाल्या आहेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने दोन वेगवेगळ्या पदांवर यश मिळवल्याने भोरच्या राजकारणात या निकालाची विशेष चर्चा होत आहे. या विजयामुळे भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे जिल्हा परिषद निकालांचा आढावा
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 73 जागांपैकी 56 जागांचे निकाल किंवा आघाडीची स्थिती स्पष्ट झाली आहे. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार विविध पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.









