UAE मध्ये भारतीय व्यक्तीचा मर्डर, मृतदेहाचे 9 तुकडे केले, पत्नी 'बेपत्ता' असल्याने सस्पेन्स वाढला
Karnataka man murdered in Sharjah : यूएईतील शारजाहमध्ये कर्नाटकच्या एल्विन प्रकाश कुंदर यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलाचा ठावठिकाणा न लागल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
UAE मध्ये भारतीय व्यक्तीचा मर्डर
मृतदेहाचे 9 तुकडे केले, पत्नी 'बेपत्ता' असल्याने सस्पेन्स वाढला
Karnataka man murdered in Sharjah : चांगलं आयुष्य आणि उज्वल भविष्याच्या शोधात कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंडापूर येथून यूएईतील शारजाह येथे गेलेल्या एल्विन प्रकाश कुंदर यांची जुलैमध्ये निर्घृण हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश शारजाह विमानतळावर गेल्या 14 वर्षांपासून काम करत होते. ते पत्नी टीना कुंदर आणि दहावीत शिकणाऱ्या मुलासोबत शारजाहमध्ये राहत होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, प्रकाश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शेवटचे भारतात आले होते आणि त्यानंतर पुन्हा यूएईला गेले होते. त्यांची पत्नी टीना या उडुपीतील उद्यावर येथील रहिवासी असून त्या शाळेत शिक्षिका आहेत.
हेही वाचा : 'हे इतकं विषारी होत चाललंय..', साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंची पोस्ट
प्रकाश यांनी फोन न उचलता 'तो' संदेश पाठवला
प्रकाश यांचे भाऊ अनिल प्रशांत कुंदर यांनी सांगितल्यानुसार, 20 जुलैच्या आसपास त्यांनी प्रकाश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रकाश यांनी फोन न उचलता आपण ठीक असल्याचा मजकूर पाठवला. मात्र, प्रकाश नेहमी व्हॉइस मेसेजद्वारे संवाद साधत असल्याने हा संदेश कुटुंबीयांना संशयास्पद वाटला. त्यानंतर सुमारे आठवड्याने अनिल यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शारजाहमधील प्रकाश यांचे क्लासमेट मनोहर यांच्याशी संपर्क साधून प्रकाश यांची माहिती घेण्यास सांगितले. मनोहर प्रकाश यांना कंपनीने दिलेल्या फ्लॅटवर गेले असता वॉचमनने प्रकाश भारतात गेल्याचे कथितपणे सांगितले. कंपनीच्या एचआर विभागाकडूनही सुरुवातीला कुटुंबीयांना प्रकाश भारतात गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनिल यांनी प्रकाश भारतात परतले नसल्याचे कंपनीला सांगितल्यानंतर त्यांच्या ठिकाणाचा शोध घेण्याची विनंती केली.
हेही वाचा : कॉमेडियन पुलकित मणी यांना मंचावर बोलवणं आणि पीएम मोदी यांची मिमिक्री करणं हा अपमान?
