बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय
Shindewadi court decision Court acquits Vanchit Bahujan Aaghadi : मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा बिल्डरकडे काम करणाऱ्या राहुल जाधव या तरुणासोबत कथित मारहाण करण्यात आल्याचा तसेच त्याला जातिसूचक शब्दांचा वापर करून अपमानित करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. या प्रकरणी बिल्डर सुशील रहेजा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका
शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय
Shindewadi court decision Court acquits Vanchit Bahujan Aaghadi : मुंबईतील चेंबूर परिसरात रहेजा बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दादर येथील शिंदेवाडी न्यायालयाने या सर्व आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित कार्यकर्त्यांची अटक हीच बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा बिल्डरकडे काम करणाऱ्या राहुल जाधव या तरुणासोबत कथित मारहाण करण्यात आल्याचा तसेच त्याला जातिसूचक शब्दांचा वापर करून अपमानित करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. या प्रकरणी बिल्डर सुशील रहेजा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी संबंधित बिल्डरला अटक न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
या नाराजीचा उद्रेक होत VBA च्या कार्यकर्त्यांनी चेंबूर येथील रहेजा बिल्डरच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. या घटनेदरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोडकेली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कार्यकर्ते बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करताना दिसून येत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीची कारवाई करत वंचित महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे सागर गवई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि त्यांना ताब्यात घेतले होते. या अटकेनंतर VBA कडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. कार्यकर्त्यांची अटक अन्यायकारक असल्याचा दावा करत पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर शिंदेवाडी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करत सर्व आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवली आणि त्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले.










