सोलापुरात हॉटेलवर मतदान पेट्या सापडल्या, आता 2 अधिकारी अन् पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार, प्रशासनाची माहिती

मुंबई तक

Solapur Politics : सोलापुरातील मोहोळ तालुक्यात 7 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एका ढाब्यावर आढळून आलेल्या राखीव कंट्रोल युनिट आणि बॅलेट पेपर युनिट घटनास्थळावरून पंचनामा करून ताब्यात घेऊन सील करण्यात आलेल्या आहेत. त्या मशीन राखीव होत्या त्यामध्ये कोणतेही मतदान नव्हते; परंतु कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित दोन अधिकाऱ्यांसह त्या गाडीत असणारे पोलिस कर्मचारी व ड्रायव्हर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Solapur Politics :
Solapur Politics :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापुरात हॉटेलवर मतदान पेट्या सापडल्या

point

आता 2 अधिकारी अन् पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार, प्रशासनाची माहिती

Solapur Politics : मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान रविवारी (दि.2) रात्री अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला होता. कुरुल जिल्हा परिषद गटातील मतदान पेट्या शहरानजीकच्या पुणे रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर आढळून आल्या. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. शिवाय या प्रकारामुळे प्रशासनाच्या संशयास्पद कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद पाटील यांनी आपली चूक झाल्याचे कबूल केले. दरम्यान, या प्रकरणात आता जिल्हा प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आहेत. 

सोलापुरातील मोहोळ तालुक्यात 7 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एका ढाब्यावर आढळून आलेल्या राखीव कंट्रोल युनिट आणि बॅलेट पेपर युनिट घटनास्थळावरून पंचनामा करून ताब्यात घेऊन सील करण्यात आलेल्या आहेत. त्या मशीन राखीव होत्या त्यामध्ये कोणतेही मतदान नव्हते; परंतु कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित दोन अधिकाऱ्यांसह त्या गाडीत असणारे पोलिस कर्मचारी व ड्रायव्हर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

कुरुल केंद्रांतर्गत नेमलेले क्षेत्रीय अधिकारी प्रसाद माणिक पाटील यांना 2 राखीव कंट्रोल युनिट आणि 2 बॅलेट युनिट देण्यात आल्या होत्या. मतदान संपल्यानंतर ही यंत्रे त्यांनी सुरक्षा कक्षात जमा करणे आवश्यक होते, परंतु ती वेळेत जमा झाली नाहीत. जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला गेला, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांचा ड्रायव्हर त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मतदान यंत्रे असलेल्या गाडीसह हॉटेल स्वराज येथे निघून गेला होता. हॉटेलबाहेर गाडीत मतदान यंत्रे असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर तिथे गर्दी जमली. दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. प्रचंड गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, नायब तहसीलदार संदेश भोसले ,नायब तहसीलदार सुधाकर धाईजे निवडणूक शाखा प्रमुख अनिल शहापुरे यांच्यासह पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यामुळे मतमोजणी थांबवण्यात यावी व पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया घ्यावी. जिल्ह्यात ईव्हीएमचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली. ईव्हीएम मशीन हे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या मशीन एवढेच संवेदनशील मशीन आहे. ते इतर कुणाच्या हाताला लागणं म्हणजे रिझर्व बँकेचे मशीन खासगी माणसाच्या हाती देण्यासारखं आहे. याबाबत विशिष्ट अशा प्रकारचा प्रोटोकॉल आहे, तो सर्व मोडीत काढून ते मशीन खासगी गाडीत एका धाब्यावर सापडणं म्हणजे भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाची शंका निर्माण करणार आहे. ईव्हीएम धाब्यावर सापडणं ही प्रशासनाची अतिगंभीर चूक आहे, असं राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp