शरद पवारांची प्रकृती बिघडली, गोविंद बागेतून पुण्याच्या दिशेने रवाना

मुंबई तक

Sharad Pawar health Update : मिळालेल्या माहितीनुसार, साडेदहाच्या सुमारास दोन डॉक्टरांच्या पॅनलची ॲम्बुलन्स गोविंद बागेत दाखल झाली होती. प्राथमिक तपासणीनंतर शरद पवार यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला

ADVERTISEMENT

Sharad Pawar health Update
Sharad Pawar health Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांची प्रकृती बिघडली

point

गोविंद बागेतून पुण्याच्या दिशेने रवाना

Sharad Pawar health Update : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद बाग येथून त्यांना खासगी कारमधून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत होते.

हेही वाचा : बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, साडेदहाच्या सुमारास दोन डॉक्टरांच्या पॅनलची ॲम्बुलन्स गोविंद बागेत दाखल झाली होती. प्राथमिक तपासणीनंतर शरद पवार यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांना घेऊन सुप्रिया सुळे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये काळजी व्यक्त केली जात आहे.

रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल. आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ."

हे वाचलं का?

    follow whatsapp