विहिरीजवळून चालले होते लोक, डोकावून पाहिल अन् सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
Crime News : विहिरीच्या शेजारुन चालत जाणाऱ्या माणसांना विहिरीतून घाण वास येऊ लागला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता एका महिलेचा मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांनी एकच गर्दी केली. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील ही घटना आहे. हा मृतदेह २५ वर्षीय मुलीचा असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विहिरीजवळून चालले होते लोक
डोकावून पाहिल अन् सगळेच हादरले
नेमकं काय घडलं?
Crime News : विहिरीच्या शेजारुन चालत जाणाऱ्या माणसांना विहिरीतून घाण वास येऊ लागला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता एका महिलेचा मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांनी एकच गर्दी केली. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील ही घटना आहे. हा मृतदेह २५ वर्षीय मुलीचा असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : पोलिसांना बैलांनी केली मदत; खूनाच्या आरोपीपर्यंत पोहोचवले, पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह
'असा' सापडला मृतदेह
बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराममध्ये एका विहिरीत 25 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बड्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलमपूर मार्गालगत असलेल्या एका विहिरीतून हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी-सकाळी काही ग्रामस्थ विहिरीच्या जवळून जात असताना त्यांना उग्र दर्प आला. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
मृतदेह शीतगृहात
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय साधारण 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असून तिची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बड्डी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला असून एफएसएल पथकानेही घटनास्थळावरुन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. सध्या हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी सासाराम येथील रुग्णालयातील शीतगृहात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.