अर्चना पाटलांकडून पराभव होताच सक्षणा सलगर ओमराजे निंबाळकरांवर संतापल्या, काय काय म्हणाल्या? VIDEO

मुंबई तक

Sakshana Salgar on Omraje Nimbalkar : सक्षण सलगर म्हणाल्या, ओबीसी मराठा वाद लावला गेला. मतदारांना दमदाटी करण्यात आली. भाजपच्या अर्चना पाटील यांनी दमदाटी केली. तेर गावचे सीसीटीव्ही चेक केले जावेत. कोट्यावधी रुपयांचं वाटप झालं. शेतकरी मुलगी म्हणून लढले. मला पराभवाचं दु:ख झालेलं नाही. 

ADVERTISEMENT

Sakshana Salgar on Omraje Nimbalkar
Sakshana Salgar on Omraje Nimbalkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्चना पाटलांकडून पराभव होताच सक्षणा सलगर ओमराजे निंबाळकरांवर संतापल्या

point

काय काय म्हणाल्या? VIDEO

Sakshana Salgar on Omraje Nimbalkar : धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तेर जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी 2 हजार 328 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. या लढतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या विजयामुळे धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीची ताकद वाढली असून अर्चना पाटील यांचे नाव आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये आघाडीवर घेतले जात आहे.  तेर गटातील ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मतमोजणीदरम्यान अर्चना पाटील यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखत विजय आपल्या नावावर केला. त्यांच्या या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली.

हेही वाचा : बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय

दरम्यान, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार सक्षणा सलगर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर संतापलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. "निवडणुका सुरु होत्या, तेव्हा मी सांगितलं होतं की, जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे. मी महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला पुन्हा एकदा सांगते की, ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या भावजयीला निवडून आणण्याचा प्लॅन यशस्वी केलाय. त्यांनी अप्रत्यक्षपणे अर्चना पाटील निवडून येतील, यासाठी प्लॅन आखला होता. त्यांचा तो प्लॅन यशस्वी झालाय. मी ओमराजे आणि कैलास पाटलांचं अभिनंदन करते. जिल्ह्याला आणि राज्याला कळूद्या की दोन्ही भाऊ एक आहेत. त्यांना जिल्ह्यात दुसऱ्याची एन्ट्री नकोय. येडशी गटात आघाडी होते, सिद्धेश्वर वडगावमध्ये महाविकास आघाडी होते. जाणीवपूर्वक ओमराजे निंबाळकर यांनी तेरमध्ये आघाडी केली नाही. अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजे निबांळकर यांनी मदत केली", असं सक्षणा सलगर म्हणाल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp