आंतराजातीय विवाहाचा राग, भावाने गर्भवती बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला केला, लग्नसमारंभात उडाला गोंधळ

मुंबई तक

• 08:53 PM • 19 Feb 2026

Crime news : आंतराजीतय विवाहातून भावानेच आपल्याच बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेल्या बहिणीचं नाव मिनाक्षी असे होते. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बहिणीच्या पोटात चार महिन्यांचं बाळ असताना भावाने कुऱ्हाडीने केला हल्ला

point

हल्ल्यात पीडित महिलेची प्रकृती गंभीर 

Crime news : कन्नडातील कोप्पलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंतराजातीय विवाहातून भावानेच आपल्याच बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेल्या बहिणीचं नाव मिनाक्षी असे होते, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल

बहिणीच्या पोटात चार महिन्यांचं बाळ असताना भावाने कुऱ्हाडीने केला हल्ला

मीनाक्षीचे दीड वर्षांपूर्वी चित्तपूर येथील उदय कुमारवर प्रेमसंबंध  होते, तिने त्याच्याशी विवाह देखील केला होता. कुटुंबाचा विरोध न जुमानता, प्रेमविवाह केला होता, नंतर ते जोडपं बंगळुरू येथे राहण्यासाठी गेले होते. बहीण मिनाक्षी गावी आली असता, बहिणीच्या येण्याची माहिती मिळताच तिचा भाऊ मंजुनाथ दारूच्या नशेत लग्नसमारंभात आला आणि त्याने गर्भवती मीनाक्षीवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

हल्ल्यात पीडित महिलेची प्रकृती गंभीर 

या हल्ल्यात तिच्या डोक्याला, पाठीला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. नंतर तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते, तसेच तिच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले. तिची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : तरुण पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला, नवरा व्हीलचेअरवर... बाहेर येताच मृतदेह आढळला

माध्यमांशी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, 'आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. प्रथमदर्शनी, कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्याच्या नावाखाली हा गुन्हा केला. या प्रकरणाचा पुढील तपासातून हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता हे लवकरच स्पष्ट होईल', असे ते म्हणाले.