स्पर्धा परीक्षा करणारा तरुण मैत्रिणीला घेऊन रुमवर गेला, शेवटी झाला मर्डर

मुंबई तक

• 08:33 AM • 13 Oct 2026

दुर्ग येथील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तो आपल्या मैत्रिणीसोबत पीजीवर गेला होता. तिथे उपस्थित असलेल्या तरुणांसोबत त्याचा वाद झाला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

स्पर्धा परीक्षा करणारा तरुण मैत्रिणीला घेऊन रुमवर गेला

point

शेवटी झाला मर्डर

point

नेमकं काय घडलं?

Crime News : छत्तीसगडमधील दुर्ग शहरात सिगरेट मागण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हरिनगर भागात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत चित्रेश सहारे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता आणि भिलाई येथील कॅम्पसमध्ये त्याचे एसबीआय (SBI) परीक्षेचे केंद्र होते.

हे वाचलं का?

मैत्रिणीसोबत पीजीवर गेला अन्...

घटनेच्या दिवशी चित्रेश आपल्या मैत्रिणीला घेऊन मित्राच्या पीजी (PG) रूमवर गेला होता. त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणारे राजकुमार यादव आणि वैभव मानकर हे दोघे तरुण तिथे आले. सिगरेट मागण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला, ज्याचे पर्यवसान नंतर धक्काबुक्कीत झाले. यादरम्यान चित्रेशसोबत असलेल्या मैत्रिणीबद्दल काही अपशब्द बोलल्यामुळे वाद अधिकच वाढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.

हे ही वाचा : कोल्हापूर : प्रेयसीचं लग्न ठरलं, संतापलेल्या तरुणाने थेट कड्यावरुन ढकलून संपवलं

नेमकं काय घडलं?

वादाचे रूपांतर हिंसक वळण घेतल्यानंतर दोन्ही आरोपी युवकांनी चित्रेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात चित्रेशच्या पायावर आणि जांघेस गंभीर जखम झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : नात्यानं आजी लागणाऱ्या विधवा महिलेसोबत प्रेमविवाह, कुटुंबियांचा थरारक प्लॅन, तरुणाचा काढला काटा

आरोपी कोण आहेत?

माहिती मिळताच मोहन नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या एका तासाच्या आत विशेष पथकाच्या (SIT) साहाय्याने दोन्ही आरोपींना अटक केली. राजकुमार यादव आणि वैभव मानकर हे दोघेही राजनांदगांवचे रहिवासी असून झोमॅटो व रॅपिडोमध्ये डिलिव्हरीचे काम करतात. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना न्यायिक रिमांडवर पाठवले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.