वर्गमैत्रिणीच्या घरी गेला अन् गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, दहावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?

मुंबई तक

• 07:11 AM • 13 Oct 2026

फरिदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दहावीत शिकणारा एक मुलगा त्याच्या वर्गमैत्रिणीच्या घरी गेला होता. काही वेळानंतर त्याचा तिथे मृत्यू झाला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वर्गमैत्रिणीच्या घरी गेला अन् गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

point

दहावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?

Crime News : हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यात  दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा त्याच्याच वर्गमैत्रिणीच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबाने आणि नातेवाइकांनी गंभीर आरोप करत त्याला घरात बोलावून निर्घृणपणे मारहाण करण्यात आली आणि हत्या करून हा प्रकार आत्महत्येसारखा दाखवण्यासाठी मृतदेह फासावर लटकवण्यात आल्याचा दावा केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

रुग्णवाहिकेवर जमावाचा हल्ला

मुलाच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी मुलगी राहत असलेल्या घराबाहेर मोठी गर्दी केली. काही वेळातच या ठिकाणी तणाव वाढला आणि जमावाने हिंसक वळण घेतले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकावर आणि मृतदेह वाहून नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेवर जमावाने हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

हे ही वाचा : कोल्हापुरात थरार! भरधाव कंटेनरची तीन दुचाकींना धडक, चौघांचा जागीच मृत्यू

रुग्णवाहिकेचा चालक पळाला

परिस्थिती बिघडल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाने जीव वाचवण्यासाठी तिथून काढता पाय घेतला. जमावाने रुग्णवाहिकेची तोडफोड केली असून चालकाने आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य आणि वाढता तणाव लक्षात घेता सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) राजीव कुमार हे मोठ्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कडक कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे ही वाचा : पत्नीने दारूड्या नवऱ्याला संपवलं, गुन्ह्यात पोटच्या लेकरांचा समावेश

गुन्हा दाखल, कारवाई होणार का?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने पोलिसांवर हल्ला केला असून रुग्णवाहिकेचे नुकसान केले आहे. या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व अंगांनी सखोल तपास करत आहेत. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.