परपुरुषासोबत हॉटेलमधून बाहेर आली महिला अन् समोर नवरा, पुढे काय घडलं?

मुंबई तक

• 07:11 AM • 12 Oct 2026

बिजनोरमधील एका हॉटेलबाहेर पती-पत्नी आणि एका तरुणामध्ये मोठा वाद निर्माण झाला. पतीने आरोप केला की, त्याची पत्नी त्या तरुणासोबत हॉटेलच्या खोलीत सुमारे चार तास होती. तेथून निघून गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गोंधळ सुरू झाला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

परपुरुषासोबत हॉटेलमधून बाहेर आली अन् समोर नवरा

point

पुढे काय घडलं?

point

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Crime News : एका हॉटेलबाहेर पती, पत्नी आणि एका तरुणादरम्यान झालेल्या राड्याची घटना समोर आली आहे. पती शोएब याच्या दाव्यानुसार, त्याला त्याच्या पत्नीच्या कथित प्रियकराचा फोन आला होता, ज्याने तो त्याच्या पत्नीसोबत चांदपूर येथे आल्याचे सांगितले. या माहितीवरून शोएब हॉटेलबाहेर पोहोचला आणि तब्बल चार तास वाट पाहिल्यानंतर त्याने पत्नीला एका तरुणासोबत हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले. दोघे कारमध्ये बसून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच शोएबने कार अडवून चावी काढून घेतली, ज्यामुळे रस्त्यावर जोरदार वाद सुरू झाला आणि लोकांची मोठी गर्दी जमली. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

पत्नीवर देह व्यापारात गुंतल्याचा आरोप

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये शोएब आपल्या पत्नीवर देह व्यापारात गुंतल्याचा गंभीर आरोप करताना आणि तिला रंगेहाथ पकडल्याचा दावा करताना दिसत आहे. या गोंधळानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. ठाण्यातही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. पतीने आपल्या पत्नीवर आणि नोएडा येथील तरुणावर गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आणि विरोध केल्यावर जीवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा : लोणावळा : 83 वर्षीय आजोबांकडून 32 वर्षीय नातवाची गोळी झाडून हत्या, अपघाताचा बनाव

एकमेकांविरोधात तक्रारी

शोएबचा अलिना हिच्यासोबत 7 फेब्रुवारी 2022 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद सुरू झाले होते, असा दावा पतीने केला आहे. पत्नीच्या कथित गैरकृत्यांना विरोध केल्यामुळेच त्यांच्यातील वाद वाढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यापूर्वीही पत्नीने चांदपूर पोलीस ठाण्यात शोएबविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शोएबच्या मते तो गुन्हा पूर्णपणे बनावट आहे. दुसरीकडे, पत्नीच्या वतीने देखील पतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून ती आधीपासूनच त्याच्याविरोधात तक्रार करत असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : IFFCO मध्ये भरती सुरु, 70 हजार रुपयांपर्यंत पगार, लगेच करा अर्ज

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद झाल्यानंतर दोन्ही बाजू पोलीस ठाण्यात आल्या असून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील आरोपांची सत्यता अजून सिद्ध झालेली नाही. पोलीस आता जुने विवाद, दाखल गुन्हे आणि दोन्ही बाजूंच्या तक्रारींची सखोल चौकशी करत आहेत. या चौकशीनंतरच या संपूर्ण प्रकरणाची खरी वस्तूस्थिती समोर येईल.