नात्यानं आजी लागणाऱ्या विधवा महिलेसोबत प्रेमविवाह, कुटुंबियांचा थरारक प्लॅन, तरुणाचा काढला काटा

मुंबई तक

11 Oct 2026 (अपडेटेड: 11 Oct 2026, 01:18 PM)

रामपूरमधील एक तरुण नात्यानं आजी लागणाऱ्या एका विधवेच्या प्रेमात पडला. मात्र याची भयानक किंमत त्याला चुकवावी लागली. अखेर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नात्यानं आजी लागणाऱ्या विधवा महिलेसोबत प्रेमविवाह

point

कुटुंबियांनी काढला तरुणाचा काटा

Crime News : शनिवारच्या (10 ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका कार वॉशिंग सेटंरमध्ये बसलेल्या नवजोत सिंह या युवकावर अंधाधुंद गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात नवजोतचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या धक्कादायक हत्येमागील गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

विधवा आजीवर जडला जीव

या हत्येच्या मुळाशी नवजोतच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादग्रस्त वळणे आणि गुंतागुंतीचे नातेसंबंध असल्याचे समोर येत आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी नवजोतच्या पत्नीने माहेरच्या घरी आत्महत्या केली होती, ज्यामुळे नवजोतवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो तुरुंगवासातही गेला होता. जवळपास दोन वर्षांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याचे त्याच्याच नात्यातील एका विधवा आजीसोबत प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी कायद्याला व समाजाला न जुमानता लग्नही केले. या विवाहामुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.

हे ही वाचा : "मी भारतीय नागरीक आहे अन् राहणार", ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत शेअर केला VIDEO

महिलेची मुलं परदेशात, अन् इकडे...

विशेष म्हणजे, या विधवा महिलेची मुले वयात आलेली असून ती सध्या परदेशात नोकरी करतात. लग्नानंतर नवजोत त्या महिलेला स्वतःजवळ ठेवत असल्यामुळे त्याच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा त्याच्याशी सातत्याने वाद सुरू होता. नवजोतच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी त्या महिलेला एकदा तिच्या माहेरच्या लोकांच्या स्वाधीनही करण्यात आले होते; परंतु ती सर्व विरोध झुगारून पुन्हा नवजोताकडे परतली होती. या वादातूनच कुटुंबियांनी नवजोतचा काटा काढण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : यूट्यूबर ध्रुव राठीची मध्यरात्री सुटका, जंतर-मंतरवर आल्यास ..पोलिसांचा 'तो' इशारा

प्रकरणाची व्याप्ती वाढली

सध्या या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून सीओ हर्षिता सिंह यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूत्रे वेगाने हालवली आहेत. पोलीस या हत्येमागे कौटुंबिक कलह, अब्रूची भीती किंवा पत्नीच्या माहेरच्या मंडळींचा हात आहे का, या सर्व अँगलवरून कसून चौकशी करत आहेत. घटनास्थळावरील पुरावे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे लवकरच मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, अशी शक्यता आहे; परंतु या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.