Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडाची मालिका समोर आली आहे. एका होमगार्डने आपली पत्नी आणि मुलीचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली. मृतक व्यक्तीची श्याम दुलारी (वय 50) आणि पूजा साहू (वय 32) अशी ओळख समोर आली आहे. ही घटना लखनऊच्या कृष्णानगर ठाणे परिसरात भोलाखेडा येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पत्नीने दारूड्या नवऱ्याला संपवलं, गुन्ह्यात पोटच्या लेकरांचा समावेश
कौटुंबिक वादातून होमगार्डने पत्नी आणि मुलीला संपवलं
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र शंकर (वय 56) वर्षे आहे, तो लखनऊ येथे होमगार्ड म्हणून काम करत होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत प्रकरणाचा पुढील तपास केला. सुरुवातीला घटनेचा तपास केल्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता 112 अंतर्गत भोलाखेडा येथे एका व्यक्तीद्वारा पत्नी आणि मुलीच्या हत्येची सूचना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच कृष्णानगर पोलीस ठाणे परिसरात पोलिसांचे पथक घटनास्थळी आले.
डेटा केबलने गळा आवळून ठार केल्याचा आरोप
सुरुवातीला प्रकरणाचा तपास केला असता, रवींद्र शंकर हा आपली पत्नी श्यामा दुलारी आणि मुलगी पूजा साहूच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आणि कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही माहिला झोपेत असताना त्यांची हत्या करण्यात आली. रवींद्र शंकरने डेटा केबलने त्यांचा गळा आवळून ठार केल्याचा धक्कादायक आरोप आहे.
लखनऊचे डीसीपी मोहम्मद मुश्ताक यांनी सांगितलं की, आरोपी हा होमगार्ड असून त्याने स्वत: पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, या गुन्ह्यामागील खरा हेतून अद्याप समोर आला नाही, दरम्यान पोलीस सर्व बाजूंचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : Astrology : शनिदेवाची पुढे वाटचाल, 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू
पोलिसांच्या माहितीनुसार, रवींद्र शंकर आणि पत्नी श्यामा दुलारी यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. काही काळापूर्वी, एका वादानंतर श्यामा दुलारी दागिने घेऊन घरातून गेल्या होत्या. याबाबत रवींद्र शंकर यांनी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत श्यामा दुलारी ही पुन्हा घरी परतली होती. पोलिसांनी कौटुंबिक विवाद सुरु होता. पोलिसांच्या एकूण तपासातूनच एकूण प्रकरण उघडकीस येईल.
ADVERTISEMENT












