मामाने साथीदारांसह भाचीला ओलीस ठेवून केला अत्याचार, पीडितेचे गंभीर आरोप

मुंबई तक

• 01:05 PM • 10 Oct 2026

Crime News : एका विवाहित महिलेनं मामाने एका खोलीत ओलीस ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेनं केलेल्या आरोपानुसार, मामाने त्याच्या काही साथीदारांसोबत मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे.

Crime News (AI Photo)

Crime News (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाच्या आवळल्या मुसक्या 

point

महिलेला इतर साथीरांसोबत लैंगिक अत्याचार ठेवण्यास केली जबरदस्ती 

Crime News : एका विवाहित महिलेनं मामाने एका खोलीत ओलीस ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेनं केलेल्या आरोपानुसार, मामाने त्याच्या काही साथीदारांसोबत मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सुमारे पाच दिवसांनंतर, पीडितेनं तिच्या कुटुंबीयांसह पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे 7 ऑक्टोबर रोजी धनवार पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.हे प्रकरण झारखंडमधील गिरिडीह येथील आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : आज 'या' राशींनी पैसा जपून वापरा, नाहीतर व्हाल कंगाल?

भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाच्या आवळल्या मुसक्या 

पोलिसांच्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना 1 ऑक्टोबर रोजी घडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, जो पीडितेचा मामा असल्याची माहिती समोर आली असता, मामाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीस सध्या इतर संशयितांचा शोध घेत आहेत, अशी माहिती एनडीटीव्ही मराठी या वृत्त माध्यमाने दिली होती. 

महिलेला इतर साथीरांसोबत लैंगिक अत्याचार ठेवण्यास केली जबरदस्ती 

पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेनं सांगितलं की, या काळात आरोपीने तिला इतर पुरुषांसोबत देखील लैंगिक संबंध ठेवावे लागतील असे सांगितले होते. तिने याला विरोध केल्यानंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. पीडितेच्या आरोपानुसार, त्यानंतर तीन-चार तरुण तिथे आले असता, त्यांनी तिला काहीतरी खाण्यास दिले होते आणि ती बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तिला शुद्ध आली. तिने ही घटना कुटुंबीयांना सांगितली आणि पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. 

हे ही वाचा : CJP Protest : दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपके कधी पोहोचणार?

यानंतर कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी एफआरआय दाखल केल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाचा पुढील तपास करत आरोपीला अटक केली.