तीस लाखांची जमीन विकून गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन, शेवटी कालव्यात सापडले मृतदेह

मुंबई तक

• 11:44 AM • 09 Oct 2026

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यातची हत्या करण्यात आली आहे. रोहतकमधील ही घटना असून यामागे धक्कादायक कारण असल्याचे समोर आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तीस लाखांची जमीन विकून गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन

point

शेवटी कालव्यात सापडले मृतदेह

Crime News : हरियाणातील रोहतक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुण आणि त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह एका कालव्यात फेकून देण्यात आले. रविवारी (4 ऑक्टोबर) संध्याकाळी पोलिसांनी कालव्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हे दोघेही एकत्र राहत होते. या प्रकरणी दुहेरी हत्येचा संशय थेट तरुणाच्या मित्रांवरच व्यक्त केला जात असून, या धक्कादायक कृत्यामुळे रोहतक हादरले आहे.

हे वाचलं का?

'अशी' झाली हत्या

मृत तरुणाचे पूर्वी रोहतकमधील हसनगड गावात जनरल स्टोअरचे दुकान होते. मात्र, सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्याने ते दुकान बंद केले आणि प्रेयसीसोबत दिल्लीत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. 26 सप्टेंबर रोजी दोघेही कारने मित्रांना भेटण्यासाठी रोहतक येथे आले होते. 30 सप्टेंबर रोजी तरुणाचे त्याच्या आईशी शेवटचे फोनवर बोलणे झाले, मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद झाले आणि कुटुंबीयांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. शेवटी कालव्यात त्यांचे मृतदेह आढळल्याने या गूढ बेपत्ता प्रकरणाचा दुर्दैवी शेवट झाला.

हे ही वाचा : मुंबई : IIT पवई कॅम्पसमध्ये रात्री आगीचा भडका! दोन चिमुकल्यासंह पाचजण होरपळले

जमीन विकून मिळाले होते तीस लाख

काही दिवसांपूर्वीच या तरुणाने आपली एक जमीन विकली होती आणि त्यातून त्याला तब्बल 30 लाख रुपये मिळाले होते. हत्येनंतर या युगुलाची कार देखील गायब असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अवघ्या 30 लाखांच्या रकमेसाठी आणि कार हडपण्याच्या उद्देशातून मित्रांनीच हा कट रचून दोघांचा काटा काढला का, या दृष्टीने पोलीस सध्या तपास करत आहेत. पैशांचा हा व्यवहारच या दुहेरी हत्येमागील मुख्य कारण ठरल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : कोल्हापुरात थरार! भरधाव कंटेनरची तीन दुचाकींना धडक, चौघांचा जागीच मृत्यू

हत्येचं नेमकं कारण काय?

या प्रकरणी नितेश उर्फ मेडिस आणि नितेश उर्फ बच्चा या दोन आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत या दोन्ही संशयित मित्रांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली कार आणि इतर पुरावे हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू असून, आरोपींच्या सखोल चौकशीनंतरच या हत्याकांड मागील नेमके सत्य समोर येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.