पत्नी परपुरुषासोबत रिक्षात दिसली, पती संतापला; भर रस्त्यात राडा

मुंबई तक

• 06:22 AM • 09 Oct 2026

Crime News : फिरोजाबादमध्ये पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत ऑटोमध्ये पकडल्याने रस्त्यावरच गोंधळ झाला. पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार देत, तो दारू पिऊन मारहाण करत असल्याचा आरोप केला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पत्नी परपुरुषासोबत रिक्षात दिसली

point

पती संतापला; भर रस्त्यात राडा

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत ऑटोमध्ये रंगेहात  पकडल्याची घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर एकाच ऑटोमधून जात असताना पतीने दोघांना पाहिलं. त्यानंतर त्याने दोघांना ऑटोमधून खाली उतरवलं आणि मारहाण केली. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने पतीसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला.

हे वाचलं का?

हेही वाचा : नवऱ्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाहिला बायकोचा व्हिडिओ, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा

ही घटना रविवारी दुपारी राजा का तालजवळ घडल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित तरुण एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. संबंधित तरुण गुरुग्राममध्ये राहून मजुरीचं काम करतो. लग्नानंतर काही काळ तो पत्नीलाही गुरुग्रामला घेऊन गेला होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये राहण्याच्या काळातच त्याची पत्नी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रूपवास येथील एका तरुणाच्या संपर्कात आली.

पत्नीच्या प्रियकराला मारहाण

काही काळापूर्वी पत्नी आपल्याला सोडून प्रियकरासोबत गेल्याचं पतीने सांगितलं. ती प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. दरम्यान, पत्नीचा शोध घेण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जात होता. याचदरम्यान पत्नी आणि तिचा प्रियकर फिरोजाबादमध्ये असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर तो फिरोजाबादला आला. दोघे ऑटोमधून एकत्र जात असताना त्याने त्यांना पाहिलं. त्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराला मारहाण केली आणि पत्नीला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.

घटनेनंतर पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. कुटुंबीय आल्यानंतर समझोत्याच्या आधारे महिलेला जाण्याची परवानगी दिली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिचा पती दारू पिऊन घरी मारहाण करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे आपण त्याला कायमचं सोडलं असल्याचं महिलेने म्हटलं. पती दारू पिण्यासाठी दुचाकी आणि घरातील इतर सामानही विकत असल्याचा आरोपही तिने केला आहे.