नवऱ्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाहिला बायकोचा व्हिडिओ, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा
crime news : एका महिलेनं आपल्या शेजारच्या व्यक्तीला हाताशी धरून नवऱ्याची हत्या केली. मदनने लल्लन शर्माच्या फोनमध्ये आपल्याच बायकोचा फोटो आणि व्हिडिओ पाहिला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये बायकोचा फोटो-व्हिडिओ पाहिला
नवऱ्याला जंगलात बोलावून काटा काढला
Crime News : उत्तराखंडची राजधानी देहारादूनमध्ये एका महिलेनं आपल्या शेजारच्या व्यक्तीला हाताशी धरून नवऱ्याची हत्या केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी महिला देवी (वय 30) आणि तिच्या शेजारी राहणारा व्यक्ती लल्लन शर्मा (वय 23) याला अटक केली आहे. मृत नवऱ्याची मदन मुखिया (वय 32) अशी ओळख समोर आली. शनिवारी मदनचा मृतदेह हा प्रेमनगर येथील जंगलात आढळून आला होता. त्याच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले होते.
हे ही वाचा : राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा
शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये बायकोचे फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी मदनने लल्लन शर्माच्या फोनमध्ये आपल्याच बायकोचा फोटो आणि व्हिडिओ पाहिला होता. मदन मुखियाला आपली पत्नी आणि शेजाऱ्यांमध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. यानंतर दोघांनाही जीवे मारहण्याची धमकी दिली होती. अशातच ते त्यांच्या नातेसंबंधाबाबत दुसऱ्याला सांगणार असल्याची धमकी देऊ लागला होता. पोलिसांचे म्हणणे असंय की, देवी आणि लल्लन दोघांनी मिळून मदनला आपल्या मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
दारू पिण्याच्या बहाण्याने नवऱ्याला जंगलात बोलावून काटा काढला
देहारादून पोलिसांच्या माहितीनुसार, देवी आणि लल्लन शर्मा हा एकमेकांशी गेली काही वर्षे एकमेकांच्या संपर्कात होते. मदन आणि लल्लन दोघेही मजुरीचे काम करत होते. पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी सायंकाळी शाम देवीने मदनला दारू पिण्याच्या बहाण्याने जवळच्या एका जंगलात नेले. जंगलात लल्लन शर्मा हा आधीच आला होता. संबंधित प्रकरणात आरोपीने मदनवर चाकूने हल्ला केला आणि या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
हे ही वाचा : Astrology : बुध आणि शनीमुळे षडाष्टक योगाची निर्मिती, 'या' राशींना सावधानतेचा इशारा
नंतर प्रेमनगर येथील जंगलात मदनचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास केला आणि घटनास्थळाजवळील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. यदरम्यान, पोलिसांनी आरोपी लल्लन शर्माला एका मंदिराजवळून अटक केले. लल्लनने मदनची हत्या केल्याबाबत कबुलीनामा दिला.
