Dharashi Crime News, गणेश जाधव : कळंब शहर परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. गणेश शिवाजी टेकाळे याच्यावर पत्नी कोमल हिच्या हत्येचा संशय असून, घटनेनंतर तो फरार झाल्याची माहिती आहे. हत्येपूर्वी पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांबाबतचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे आणि तो नातेवाईकांसह इतरांना पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी दुपारी सुमारे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने कोमलला दुचाकीवर बसवून कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव (केज) परिसरातील ज्वारीच्या शेतात नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
पत्नीची दगडाने ठेचून हत्या
ज्वारीच्या शेतात नेल्यानंतर कोमलवर मारहाण करण्यात आल्याचा आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ही घटना महिलेच्या सुमारे चार वर्षांच्या चिमुकल्या मुलासमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर मुलानेच पोलिसांना घटनास्थळ दाखवल्याचे सांगण्यात येतंय. मात्र, या प्रकरणातील प्रत्येक बाबीची अधिकृत पुष्टी पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. हत्येदरम्यान आरोपीने मोबाइलवरून व्हिडिओ शूट केला. त्यानंतर आरोपीने WhatsApp Status ठेवून पत्नीला शिक्षा दिल्याचा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओ आणि WhatsApp Statusमुळे पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर दबाव टाकला
घटना घडल्यानंतर संशयित पती घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे संकलित करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली होती. संशयित पती गणेश शिवाजी टेकाळे हा इंजिनीअर असून पुनर्वसन सावरगाव येथे राहत असल्याची माहिती आहे. तो सध्या बेरोजगार होता आणि मागील काही दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेल्याची परिसरात चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या बाबींची अधिकृत पुष्टी तपासातून होणे बाकी आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर दबाव टाकला आणि कथित अनैतिक संबंधांबाबत कबुली घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ नातेवाईकांसह इतरांना पाठवल्याचीही माहिती समोर आली आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय,ज्वारीच्या शेतात नेऊन झालेली हत्या आणि हत्येनंतर ठेवण्यात आलेला WhatsApp Status यामुळे कळंबमधील हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? हत्येमागे पूर्वनियोजन होते का, व्हिडिओमध्ये नेमके काय आहे आणि हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संशयित पती घटनास्थळावरून फरार असल्याने त्याचा शोध घेण्याचेही पोलिसांसमोर आव्हान आहे. या प्रकरणातील आरोप आणि घटनाक्रमाबाबत अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












