प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
Latur professor murder case : लातूरमध्ये बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून 32 वर्षीय प्राध्यापकाची दोन भावांनी मिळून अपहरण करून हत्या केली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं
बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
Latur professor murder case : लातूरमध्ये बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोन भावांनी मिळून 32 वर्षीय प्राध्यापक नितीन धनजी संगमे यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीये. दोन भावांनी आपल्या दोन मित्रांसोबत मिळून ही हत्या केल्याचा आरोप आहे. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कनेरी चौक परिसरातून नितीन यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना बर्दापूर गावातील स्टोन क्रशर प्रकल्पावर नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज देशमुख आणि धवल देशमुख यांनी प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके यांच्या मदतीने ही घटना घडवून आणली. चारही आरोपी नितीन यांना MH 24 CD 7474 क्रमांकाच्या SUV मधून स्टोन क्रशर प्रकल्पावर घेऊन गेले होते.
हेही वाचा : कायम साधेपणाने जगलेले नाना पाटेकर किती कोटींचे मालक? मागे सोडली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती!
नितीन हे कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते
स्टोन क्रशर प्रकल्पावर नेल्यानंतर चारही आरोपींनी नितीन यांना काठी, पट्टा आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने नितीन यांचा मृत्यू झाला. नितीन हे कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि कनेरी चौक परिसरात राहत होते. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात लातूर शहराचे डीवायएसपी समरसिंह साळवे यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा : कायम साधेपणाने जगलेले नाना पाटेकर किती कोटींचे मालक? मागे सोडली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती!
