कायम साधेपणाने जगलेले नाना पाटेकर किती कोटींचे मालक? मागे सोडली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती!
नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात निधन झाले असून त्यांच्या मागे गोवा-मुंबईतील घरे, पुण्याजवळील 27 एकरांचे फार्महाऊस आणि कोट्यवधींची संपत्ती असल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नाना पाटेकर यांची अंदाजे नेटवर्थ 80 कोटी रुपये असून त्यांनी ‘NAAM Foundation’च्या माध्यमातून शेतकरी आणि गरजू कुटुंबांसाठी मोठे सामाजिक कार्य केले.
ADVERTISEMENT

मुंबईः बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘वेलकम’, ‘अब तक छप्पन’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या नाना पाटेकर यांनी चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीसोबतच त्यांनी मागे ठेवलेल्या संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे.
गोव्यात घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्यानंतर गोव्यातील त्यांच्या फ्लॅटवर डॉक्टरांनी तातडीने कार्डियाक मसाज म्हणजेच CPR दिला. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, पहाटे 5.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आर्थिक अडचणींच्या काळातून कोट्यवधींच्या संपत्तीपर्यंत
नाना पाटेकर यांचे बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेले. त्यांच्या वडिलांचा टेक्सटाइल पेंटिंगचा व्यवसाय होता. कौटुंबिक व्यवसाय बंद झाल्यानंतर नाना यांनी उदरनिर्वाहासाठी झेब्रा क्रॉसिंग आणि चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्याचे काम केले होते. पुढे आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे स्थान निर्माण केले.
अंदाजे 80 कोटी रुपयांची नेटवर्थ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांची अंदाजे नेटवर्थ सुमारे 80 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. साधे जीवन जगणारे नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर जितके लोकप्रिय होते, तितकंच त्यांचं राहणीमान देखील साधं होतं.
