प्रेयसीचं लग्न ठरल्याचं समजताच प्रियकर संतापला, प्रेयसीच्या घरात घुसला अन्...

मुंबई तक

• 07:11 AM • 10 Oct 2026

Crime News : प्रेयसीचं लग्न ठरल्याने संतापलेल्या प्रियकराने घरात घुसून तिला गोळी झाडल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीचं लग्न ठरल्याचं समजताच प्रियकर संतापला

point

प्रेयसीच्या घरात घुसला अन्...

UP Crime News : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेमिकेची गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सीपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्वर नगर येथे ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव चंचल असून तिचे आरोपी कमलसोबत प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचे होते, मात्र त्यांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. दरम्यान, चंचलच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न 12 डिसेंबरला ठरवलं होतं. हे समजल्यानंतर कमलने संतापून चंचलची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं

'ती' माहिती मिळाली, अन् कमलचा चंचलला संपवण्याचा निर्णय 

पोलिसांच्या माहितीनुसार, चंचल आणि कमल हे सिद्धेश्वर नगरमध्येच राहत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि ते लग्न करण्याच्या विचारात होते. मात्र कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर चंचलच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. लग्नाची तारीखही 12 डिसेंबर निश्चित करण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर कमलने चंचलला संपवण्याचा निर्णय घेतल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : वडिलांचा व्यवसाय बुडाला अन्… सुपरस्टार नाना पाटेकरांचा थक्क करणारा प्रवास, संघर्ष आणि यश!

गोळी लागल्याने चंचलचा घटनास्थळीच मृत्यू

घटनेच्या वेळी चंचल घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी कमल मागच्या बाजूने भिंत ओलांडून घरात शिरला. त्याने चंचलच्या कनपटीला देशी बनावटीचे पिस्तूल लावून गोळी झाडली. गोळी लागल्याने चंचलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर कमल घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, रस्त्यात चंचलचे काका मोनू रायकेवार त्याला भेटले. त्यावेळी कमलने आपण चंचलला गोळी मारल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच सीपरी बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून चंचलचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपी कमलला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर सिद्धेश्वर नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.