वडिलांचा व्यवसाय बुडाला अन्… सुपरस्टार नाना पाटेकरांचा थक्क करणारा प्रवास, संघर्ष आणि यश!
नाना पाटेकर यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. दिवसाला 35 रुपये कमावण्यापासून फिल्मची पोस्टर्स रंगवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि पुढे मिळालेलं स्टारडम जाणून घ्या.
ADVERTISEMENT

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तब्बल पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली. मात्र, नाना पाटेकर यांना मिळालेलं हे यश सहजासहजी मिळालेलं नव्हतं. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं.
वडिलांचा व्यवसाय बुडाला, कुटुंबावर आर्थिक संकट
नाना पाटेकर यांचा जन्म मराठी कुटुंबात झालेला. त्यांच्या वडिलांचा टेक्सटाइल पेंटिंगचा व्यवसाय होता. मात्र, व्यवसायात झालेल्या फसवणुकीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला. परिस्थिती इतकी बिकट झाली की घरातील दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थाही कठीण झाली होती. त्यामुळे कमी वयातच नाना पाटेकर यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली.
35 रुपये रोज मिळायचे, पोस्टर्सही रंगवली
आर्थिक अडचणींमुळे नाना पाटेकर यांनी छोटी-मोठी कामं करण्यास सुरुवात केली. त्यांनी झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचं काम केलं, तसेच चित्रपटांची पोस्टर्सही पेंट केली. पार्ट-टाइम कामातून त्यांना दिवसाला अवघे 35 रुपये मिळत होते. मात्र, या परिस्थितीने त्यांनी हार मानली नाही. आर्थिक संघर्ष सुरू असतानाही त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला.
छोट्या भूमिकांपासून मोठ्या स्टारपर्यंत
नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘अंकुश’ आणि ‘प्रतिघात’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी काम केलं. सुरुवातीला छोट्या आणि सहाय्यक भूमिका करणाऱ्या नाना पाटेकर यांनी हळूहळू आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
