Crime News : ओडिशा राज्यातील केंजद्रपारा जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या मदतीने झोपलेल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. घडलेल्या घटनेनुसार, पतीच्या रोजच्या मारहाणीला कंटाळून तिने आपल्या पतीला संपवले, यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे, या घटनेनं परिसर पूरता हादरून गेल्याची घटना समोर आली आहे. मृत पतीची निरंजन अशी ओळख समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शनिदेवाची पुढे वाटचाल, 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू
पत्नीने नवऱ्याची गळा दाबून केली हत्या
घडलेल्या घटनेनुसार, निरंजन बुधवारी रात्री उशिरा दारू पिऊन घरी परतला होता. त्यानंतर त्याला झोप लागली होती. त्यानंतर आरोप करण्यात आला की, दरम्यान त्याची पत्नी मनोरमाने गळा दाबून त्याची हत्या केली. संबंधित प्रकरणात असे म्हटले जाते की, त्या दोघांमध्ये यापूर्वी वाद झाला होता. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, मनोरमाने सांगितलं की, तिचा नवरा हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने दारूच्या नशेतच घरी परतल्यानंतर तो अनेकदा तिला आणि मुलांना मारहाण करायचा.
बापाच्या हत्येत अल्पवयीन मुलगी आणि मुलाचा समावेश
मनोरमाने पुढे असा देखील दावा केला की, ती तिच्या दोन मुलांचे पालनपोषण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत होती. तिच्या म्हणण्यांनुसार, ती कथितरित्या कौटुंबिक अत्याचाराला बळी पडली होती. मनोरमाने पोलिसांना सांगितलं की, तिचा मुलगा आणि अल्पवयीन मुलीचा देखील या हत्येत समावेश आहे. या दाव्यानंतर आता पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : नवऱ्याला कॉफीतून दिले गुंगीचे औषध, गाढ झोप लागताच बायकोनं केलं भयंकर कांड
हे हत्याकांड गुरुवारी सकाळी उघडकीस आले होते. शेजाऱ्यांना निरंजनचा मृतदेह घराबाहेर पडलेला आढळून आला आणि त्यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एक वैज्ञानिक पथकही तैनात करण्यात आले. निरंजनच्या मृत्यूमागील कारण कसे घडले? याचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












