Crime News : गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवकल्कल करणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या नवजात कन्येला पिशवीत विटा बांधून तलावात फेकून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका दामप्त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
तपासासाठी पाच विशेष पथके
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी एका तलावात दोन दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींव्दारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपासासाठी पाच विशेष पथके तयार केली होती. गेल्या आठवड्यात परिसरातील प्रसूती रुग्णालयांचे जन्म रेकॉर्ड गोळा करून नुकत्याच बालकांचा जन्म झालेल्या कुटुंबांची माहिती तपासण्यात आली.
हे ही वाचा : यूट्यूबर ध्रुव राठीची मध्यरात्री सुटका, जंतर-मंतरवर आल्यास ..पोलिसांचा 'तो' इशारा
अशी दिली गुन्ह्याची कबुली
या चौकशीदरम्यान, एका रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला असता, सुरेश राठवा आणि त्यांची पत्नी संगीताबेन राठवा या दाम्पत्याची उत्तरे संशयास्पद वाटली. कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना आधीच एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने त्यांना आणखी एक मुलगी नको होती, असे तपासात समोर आले.
हे ही वाचा : 'देव मानू नकोस, देव म्हणजे सगळं काही नाही...' बायकोची कुऱ्हाडीने वार करुन हत्या; नवरा फरार
त्या दिवशी काय घडलं?
रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर हे दाम्पत्य दुचाकीवरून नवजात कन्येला घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी तिला विटा बांधून प्लास्टिकच्या पिशवीत घालून तलावात फेकून दिले. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करत दोन्ही माता-पित्यांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












