धुळे : पायाला साखळी बांधून कुलूप लावलं अन्... तापी नदीत सापडले मृतदेह, प्रेमविवाहानंतर जोडप्यासोबत काय घडलं?

मुंबई तक

10 Oct 2026 (अपडेटेड: 10 Oct 2026, 02:58 PM)

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तापी नदीच्या पात्रात एका जोडप्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Dhule News

Dhule News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पायाला साखळी बांधून कुलूप लावलं अन्...

point

तापी नदीत सापडले मृतदेह

point

प्रेमविवाहानंतर जोडप्यासोबत काय घडलं?

Dhule News, विशाल ठाकूर : धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावळदे येथील तापी नदीपात्रात काही दिवसांपूर्वी एका तरुण-तरुणीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले होते. या प्रकरणातील मृतांची ओळख पटली असून, श्याम हरी पाटील आणि सपना पाटील अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही जण मूळचे अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता.

हे वाचलं का?

घातपात की आत्महत्या?

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब पोलिसांच्या पंचनाम्यात उघड झाली असून, मृत तरुण आणि तरुणीचे पाय लोखंडी साखळीने बांधून त्यांना कुलूप लावण्यात आले होते. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबतचे गूढ अजूनही कायम असून पोलिसांच्या तपासाकाडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : दीपके, रांका आणि दास यांना अटक, आंदोलनाची पुढील धुरा सांभाळणार मराठी मुलगा

प्रेमवविवाहानंतर टोकाचा निर्णय का?

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम आणि सपना यांनी काही महिन्यांपूर्वीच परस्पर सहमतीने प्रेमविवाह केला होता. मात्र, संसाराची सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही कालावधीतच त्यांनी असा टोकाचा निर्णय नेमका का घेतला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहेत. मात्र, प्रेमविवाहानंतर घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : मामाने साथीदारांसह भाचीला ओलीस ठेवून केला अत्याचार, पीडितेचे गंभीर आरोप

नागरिकांची मागणी काय?

सध्या नरडाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सावळदे तापी पुलावर वाढत्या दुर्घटनांच्या घटना पाहता, सुरक्षेच्या कडक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.