'देव मानू नकोस, देव म्हणजे सगळं काही नाही...' बायकोची कुऱ्हाडीने वार करुन हत्या; नवरा फरार

मुंबई तक

11 Oct 2026 (अपडेटेड: 11 Oct 2026, 10:44 AM)

बायको सतत देवाची पूजा, भक्ती यांमध्ये लीन असायची. याचा नवऱ्याच्या मनात राग होता. अखेर नवऱ्याने संतापाच्या भरात पत्नीला संपवलं. राजगडमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

देव मानू नकोस, देव म्हणजे सगळं काही नाही

point

बायकोची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

point

नवरा फरार

Crime News : धार्मिक मान्यतेच्या वादातून एका पतीने आपल्या 36 वर्षीय पत्नीची कुल्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत गायत्रीबाई गुर्जर असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती रामबाबू गुर्जर घटनेनंतर फरार झाला आहे. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये देवावर श्रद्धा ठेवणे, पूजा-पाठ करणे आणि सण साजरे करण्यावरून नेहमी वाद होत असत. आरोपी पती पत्नीला देव मानण्यास विरोध करत असे आणि ती पूजा करत असल्याचा राग मनात धरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

वडिलांना फोन केला अन्...

हत्येपूर्वी मृत महिलेने आपल्या वडिलांना फोन करून पती आपल्याला मारून टाकेल, अशी भीती व्यक्त केली होती. तिने वडिलांना तातडीने येण्यास सांगितले होते, मात्र दुर्दैवाने त्यापूर्वीच शनिवारी (10 ऑक्टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. हल्लेखोर पतीने गायत्रीबाईंवर कुऱ्हाडीने चार वार केले, ज्यामध्ये पाठीवर तीन आणि मानेवर एक वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत महिलेचे चौदा वर्षांचा गब्बर आणि आठ वर्षांचा धनराज हे दोन लहान मुले पोरकी झाली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : दिल्लीमध्ये CJP चं आज पुन्हा आंदोलन; जंतर-मंतरकडे कूच, नेमकं काय घडतंय?

रामबाबू फरार

माहिती मिळताच राजगड कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फॉरेन्सिक (एफएसएल) पथकाला बोलावून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरोपी पती रामबाबू गुर्जरचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. तसेच आरोपीचे गाव हे राजस्थान सीमेपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर असल्याने पोलीस शेजारील राज्याच्या पोलिसांच्या संपर्कातही आहेत.

हे ही वाचा : मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?

पोलिसांनी काय सांगितले?

शवविच्छेदनानंतर मृत गायत्रीबाईंचा मृतदेह त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला, ज्यानंतर शनिवारी संध्याकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पोलीस या कौटुंबिक वादाच्या सर्व बाजूंनी कसून चौकशी करत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.