दिल्लीमध्ये CJP चं आज पुन्हा आंदोलन; जंतर-मंतरकडे कूच, नेमकं काय घडतंय?
CJP delhi protest : दिल्लीमध्ये CJP च्या आंदोलनाची घोषणा; जंतर-मंतरकडे कूच करण्याची तयारी. मध्य दिल्ली आणि कनॉट प्लेस परिसरात वाहतुकीत बदल होण्याची शक्यता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्लीमध्ये CJP चं आज पुन्हा आंदोलन
जंतर-मंतरकडे कूच, नेमकं काय घडतंय?
CJP delhi protest : सीजेपीच्या नेत्यांवर शनिवारी झालेल्या कारवाईनंतर रविवारी जंतर-मंतरवरील आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. CJP चे अंजिक्य शिंदे यांनी शनिवारी आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून जंतर-मंतरच्या दिशेने कूच करण्यात येणार असल्याचेही अंजिक्य शिंदे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचे नियोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. आंदोलनासाठी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढल्यास परिसरातील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा : ‘24 तासांत आंदोलकांची सुटका करा, अन्यथा उपोषणाला बसेन!’ अभिजीत दिपकेंसाठी मोठा नेता उतरणार मैदानात
दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनामुळे मध्य दिल्ली, नवी दिल्ली आणि कनॉट प्लेस परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत पक्षाने आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक वळवली जाण्याची शक्यता
CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्ली, नवी दिल्ली आणि कनॉट प्लेस परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वळवली जाण्याची शक्यता आहे. शंकर रोड-वंदे मातरम टी-पॉइंट, धौला कुआँ उड्डाणपूल, झंडेवालान, पंचकुइयां, मंडी हाऊस, डॉ. दिनेश नंदिनी डालमिया चौक आणि राम चरण अग्रवाल चौक या ठिकाणी वाहतुकीत बदल होऊ शकतात. याशिवाय मिंटो रोड-दीनदयाळ उपाध्याय मार्ग, गुरू नानक चौक आणि चेम्सफोर्ड रोड-कनॉट प्लेस आउटर सर्कल टी-पॉइंट परिसरातही वाहतूक वळवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतुकीतील संभाव्य बदलांचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
