‘24 तासांत आंदोलकांची सुटका करा, अन्यथा उपोषणाला बसेन!’ अभिजीत दिपकेंसाठी मोठा नेता उतरणार मैदानात

मुंबई तक

दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावर सोनम वांगचुक यांनी सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

ADVERTISEMENT

sonam wangchuk ultimatum modi government release abhijeet dipke cjp protest
cjp protest
Google CTA

नवी दिल्ली: दिल्लीतील आंदोलन आणि आंदोलकांच्या अटकेवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच, लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या नेत्यांची 24 तासांत सुटका झाली नाही, तर आपण उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा विचार करू, असं वांगचुक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांच्या सुटकेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीशी संबंधित अनेक जणांना ताब्यात घेतल्याचा उल्लेख वांगचुक यांनी केला आहे. या नेत्यांना तातडीने मुक्त करण्याची मागणी करत त्यांनी देशातील लोकशाही आणि नागरिकांच्या आंदोलन करण्याच्या अधिकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

‘देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती’

सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली. दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यापूर्वीच एकजुटीचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेल्या नेत्यांनाच ताब्यात घेतल्याचं समजल्यानंतर त्यांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा>> 'मोदी-शाहांच्या मनात अत्यंत पराकोटीची...', राज ठाकरेंचा प्रचंड संताप अन् जोरदार हल्लाबोल!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात अशी परिस्थिती निर्माण होईल, असं आपल्याला वाटलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करताना त्यांनी भारतात ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचं म्हटलं.