Crime News : ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध करत एका पित्याने स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. कल्याणी असे मृत तरुणीचे नाव असून, कैलाश असे आरोपी पित्याचे नाव आहे. कल्याणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही गोष्ट वडिलांना समजल्यानंतर ते संतापले होते. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी कल्याणीचे लग्न आधीच ठरवले होते आणि अवघ्या दोन दिवसांनंतर तिचा साखरपुडा होणार होता. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
बापानेच केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमसंबंधांमुळे कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती कैलाशला होती. याच रागातून त्याने 24 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याने उशीने कल्याणीचे तोंड आणि नाक दाबून तिचा श्वास रोखला. त्यानंतर हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी तिचा मृतदेह दुपट्ट्याच्या साहाय्याने घरातील छताच्या लाकडी बल्लीला लटकवला. त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे ही वाचा : सुप्रिया सुळे बैठक अर्धवट सोडून तात्काळ ब्रीच कँडीकडे रवाना, शरद पवारांना नेमकं झालं तरी काय?
घाई-घाईनेच उरकला अंत्यविधी
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने आणखी एक धक्कादायक पाऊल उचलले. त्याने 24 नोव्हेंबर रोजी सकाळीच घाईघाईने मुलीचा अंत्यविधी उरकून टाकला. यावेळी नातेवाईक येण्याचीही त्याने वाट पाहिली नाही. त्याच्या या संशयास्पद वागण्यामुळे गावकऱ्यांना संशय आला. त्यानंतर गावातील पंचायत सचिवाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर नरनूर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणाचा संशयित ऑनर किलिंग म्हणून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : नाबार्डमधील ही नोकरीची संधी सोडू नका, 1 लाख रुपयांहून अधिक पगार; काय आहेत निकष?
आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अडे कैलाश याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा, तर कलम 238 अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












