Govt Jobs : नाबार्डमधील ही नोकरीची संधी सोडू नका, 1 लाख रुपयांहून अधिक पगार; काय आहेत निकष?

नाबार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत? जाणून घ्या.

ADVERTISEMENT

NABARD Recruitment
NABARD Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नाबार्डमध्ये विविध पदांसाठी भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

NABARD Recruitment : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नाबार्डकडून ज्युनिअर प्रोजेक्ट असोसिएट आणि सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ज्युनिअर प्रोजेक्ट असोसिएट पदाच्या 21 जागा, तर सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट पदाच्या 3 जागांचा समावेश आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून, आवश्यकतेनुसार हा कालावधी आणखी तीन वर्षांनी वाढवता येणार आहे. मात्र, नियुक्तीचा एकूण कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक असणार नाही.

पात्रतेचे निकष काय?

ज्युनिअर प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी 50% गुणांसह कृषी पदवी आणि एक ते तीन वर्षांपर्यंत अनुभवाची आवश्यकता आहे. तर सीनियर प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी 50 टक्के गुणांसह कृषी पदवी आणि तीन ते पाच वर्षांपर्यंत अनुभव असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी 24 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. 

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबई, नवी मुंबईत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडणार; जाणून घ्या पालिकेची सूचना

अर्जाचे शुल्क किती?

या भरतीसाठी अर्ज शुल्कामध्येही प्रवर्गानुसार सवलत देण्यात आली आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWBD) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, त्यांना 150 रुपये सूचना शुल्क भरावे लागेल. त्यामुळे या उमेदवारांसाठी एकूण शुल्क 150 रुपये असेल. इतर सर्व प्रवर्गांतील उमेदवारांना 700 रुपये अर्ज शुल्क आणि 150 रुपये सूचना शुल्क असे एकूण 850 रुपये भरावे लागतील. या शुल्कावर लागू असलेला जीएसटी अतिरिक्त असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

हे ही वाचा : नवऱ्याचा बिझनेस हडपण्यासाठी बायकोचा खतरनाक प्लॅन, रोज हळूहळू विष दिलं; पण घडलं भलतंच!

पगार किती मिळणार?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2026 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक मानधन दिले जाणार आहे. ज्युनिअर प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी दरमहा 75 हजार ते 1 लाख रुपये, तर सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी दरमहा 1 लाख 25 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये मानधन मिळणार आहे. हे मानधन सर्व भत्त्यांसह एकत्रित स्वरूपात असणार आहे. भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी नाबार्डच्या www.nabard.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.