मुंबईची खबर : मुंबई, नवी मुंबईत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडणार; जाणून घ्या पालिकेची सूचना
मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जलवाहिनींवर सुरु असलेल्या कामामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील पाणीपुरवठ्यासंबंधी महत्त्वाची अपडेट
महापालिकांचे महत्त्वाचे आवाहन
Navi Mumbai Water Cut : नवी मुंबई आणि मुंबईतील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी बेलापूर ते ऐरोली मुख्य जलवाहिनीवर तसेच विविध जलाशयांमध्ये नवीन फ्लोमीटर आणि व्हॉल्व बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम
या कामामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्या आणि सिडकोच्या खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहील. त्यामुळे 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर 28 नोव्हेंबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
हे ही वाचा : सुप्रिया सुळे बैठक अर्धवट सोडून तात्काळ ब्रीच कँडीकडे रवाना, शरद पवारांना नेमकं झालं तरी काय?
मुंबईतही काही भागांत पाणीपुरवठा बंद
दरम्यान, मुंबईतही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गावादरम्यान मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणारे हे काम शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत चालणार आहे. या 24 तासांच्या कालावधीत 'जी उत्तर', 'के पूर्व', 'के पश्चिम', 'एच पूर्व' आणि 'एस' विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर 'के पूर्व', 'एस' आणि 'एन' विभागातील काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
हे ही वाचा : दोघा भावांनी नूडल्स खाल्ले, घरी येताच एकाचा जीव गेला, दुसरा ICU मध्ये दाखल; नेमकं काय घडलं?
महापालिका प्रशासनाचे आवाहन
त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा व या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारी म्हणून पाणी पिण्यापूर्वी ते गाळून आणि उकळून घ्यावे.
