दोघा भावांनी नूडल्स खाल्ले, घरी येताच एकाचा जीव गेला, दुसरा ICU मध्ये दाखल; नेमकं काय घडलं?

नूडल्स खाल्ल्यानंतर फरिदाबामधील एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्या दहा वर्षीय भावावर ICU मध्ये उपचार केले जात आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नूडल्स खाल्ल्यानंतर आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

point

दहा वर्षीय मुलगा ICU मध्ये

point

नेमकं काय घडलं?

Crime News : चिप्स आणि नूडल्स (चाऊमिन) खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या भावांची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आठ वर्षांच्या चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या दहा वर्षांच्या मोठ्या भावाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, लहान मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हरियाणातील फरिदाबादमधील ही घटना आहे.

आधी चिप्स, नंतर खाल्ले नूडल्स

मिळालेल्या माहितीनुसार, राघव आणि कुणाल हे दोघे भाऊ 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यांना भूक लागल्याने खाण्यासाठी काहीतरी आणण्याच्या उद्देशाने ते घरातून 10 ते 15 रुपये घेऊन निघाले होते. यावेळी रस्त्यात त्यांची एका चुलत भावाशी भेट झाली. त्याच्याकडे चिप्सचे पाकीट होते. तिघांनी मिळून चिप्स खाल्ले. त्यानंतर दोन्ही भावांनी स्थानिक बाजारातून नूडल्सदेखील खाल्ले.

हे ही वाचा : ओवैसी, आजम खान का भिडलेत? युपीतला मुस्लीम कुणाच्या बाजूने?

उपचारादरम्यान  राघवचा मृत्यू

घरी परतल्यानंतर काही वेळातच राघवला चक्कर येऊ लागली आणि मळमळ होऊ लागली. त्यानंतर मोठा भाऊ कुणाल यालाही उलट्या सुरू झाल्या. दोन्ही मुलांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना राघवचा मृत्यू झाला, तर कुणालला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, कुणालच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

हे ही वाचा : नवऱ्याचा बिझनेस हडपण्यासाठी बायकोचा खतरनाक प्लॅन, रोज हळूहळू विष दिलं; पण घडलं भलतंच!

पोलिसांनी काय सांगितलं?

या घटनेप्रकरणी दबुआ पोलीस ठाण्याचे प्रभारी सुमेर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोन्ही मुलांची प्रकृती नूडल्स (चाऊमीन) खाल्ल्यानंतर बिघडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी राघवचे शवविच्छेदन केले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.