पुणे : एसटीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात, MPSC करणारी तरुणी चाकाखाली चिरडली, VIDEO

पुण्यातील राजगुरुनगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये एका एमपीएससी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Pune MPSC Student Accident
Pune MPSC Student Accident
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात

point

एमपीएससी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

Pune MPSC Student Accident, रायचंद शिंदे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या राक्षेवाडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने 22 वर्षीय एमपीएससी विद्यार्थिनीचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. सोनाली कोळेकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एसटी बसला ओव्हरटेक करताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कोळेकर ही दुचाकीवर पाठीमागे बसून प्रवास करत होती. राक्षेवाडीतील गणेश मंदिरासमोर अरुंद रस्ता आणि वाहनांची मोठी गर्दी होती. याचवेळी दुचाकीस्वाराने एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. यावेळी मागे बसलेली सोनाली थेट एसटी बसच्या चाकाखाली आली.

हे ही वाचा : बारामती : थार चालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

चाकाखाली चिरडली सोनाली

या भीषण अपघातात सोनाली बसच्या चाकाखाली चिरडली गेली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या 22 वर्षांच्या सोनालीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : सांगली : पवनचक्कीवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा खून, विट्याजवळ काय घडलं?

राक्षेवाडीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर

दरम्यान, राक्षेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला होणारी पार्किंग, अरुंद रस्ता, अतिक्रमण आणि वाहनांची गर्दी यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्यांमुळे वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यालगतची अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.