महाराष्ट्रातील जंगलात मर्डर, 13 लाखांची सुपारी; GPS ट्रॅकरने शोधून केला खून!
Gondia Crime News : गोंदियातील बोंदरानी जंगलात वर्षा तुरकर यांची 13 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. पतीच्या प्रेमसंबंधांमुळे पत्नी मोनाने जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील जंगलात मर्डर
13 लाखांची सुपारी; GPS ट्रॅकरने शोधून खून!
Gondia Crime News : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बोंदरानी जंगलात एका 35 वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी 13 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे महिलेच्या मित्राची पत्नीच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने तिने शेजाऱ्याच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या कटासाठी पतीच्या कारमध्ये असलेल्या जीपीएस ट्रॅकरचा वापर करण्यात आला. त्याच्या मदतीने आरोपींनी जंगलात असलेल्या दोघांची अचूक जागा शोधून काढली आणि महिलेची हत्या केली.
हेही वाचा : गिलच्या मागणीला आयसीसीची नकारघंटा; बॉलवर लाळ लावण्यावरील बंदी कायम राहणार!
हत्या करण्यासाठी जीपीएस ट्रॅकरचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी गोंदिया जिल्ह्यातील बोंदरानी जंगलात ही घटना घडली. वर्षा तुरकर असे हत्या झालेल्या 35 वर्षीय महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील एका विमान कंपनीत नोकरी करत होती. वर्षा ही नितीन अग्रवाल नावाच्या व्यावसायिकासोबत जंगलात गेली होती. वर्षा आणि नितीन दोघेही विवाहित होते. मात्र, विवाहित असूनही त्यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही जंगलात बसले असताना अचानक काही अज्ञात व्यक्ती तिथे पोहोचल्या. त्यांनी वर्षावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नितीन घाबरला होता. त्याने पोलिसांना आणि वर्षाच्या कुटुंबीयांना वेगळीच माहिती दिली. काही अज्ञात व्यक्तींनी लुटमारीच्या उद्देशाने हल्ला केल्याचे त्याने सांगितले. व्यावसायिक कामानिमित्त दोघेही जंगलातून जात असताना ही घटना घडल्याचा दावा त्याने केला.
हेही वाचा : Weather Report: थंडी की उकाडा? राज्यातील हवामानाचा नवा अंदाज, पाहा कसं असेल वातावरण
पतीचे वर्षासोबत असलेले प्रेमसंबंध तिला मान्य नव्हते
मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या घटनेमागे वेगळेच कारण असल्याचा संशय निर्माण झाला. जंगलाच्या आतील भागात असलेल्या घटनास्थळी आरोपी इतक्या अचूकपणे कसे पोहोचले? असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. वर्षा आणि नितीन यांच्या कारचा माग काढताना पोलिसांना एका दुचाकीवरून तीन जण त्यांचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या तिघांनाही एकामागून एक ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या हत्येमागे 13 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले. नितीनची पत्नी मोना हिनेच या हत्येचा कट रचला होता. पतीचे वर्षासोबत असलेले प्रेमसंबंध तिला मान्य नव्हते. त्यामुळे तिने एका शेजाऱ्याच्या मदतीने वर्षाच्या हत्येचा कट रचला आणि आरोपींना 13 लाख रुपये दिले.
या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी मोनाने आरोपींना नितीनच्या कारमध्ये बसवलेल्या जीपीएस ट्रॅकरची माहिती दिली होती. या ट्रॅकरच्या मदतीने आरोपींना नितीन आणि वर्षा कुठे आहेत, याची अचूक माहिती मिळाली. त्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून त्यांच्या कारचा पाठलाग केला आणि बोंदरानी जंगलात पोहोचल्यानंतर वर्षाची चाकूने वार करून हत्या केली. सुरुवातीला लुटमारीचा प्रकार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात संपूर्ण कट उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा कट रचणारी मोना आणि अन्य तीन आरोपी अशा एकूण चार जणांना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.
