'जगण्याचा कंटाळा आलाय...', प्रेमी युगुलाची हॉटेल रुम, दोन चिठ्ठ्या अन् मृतदेह!

Crime News : फरिदाबादमधील हॉटेलमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला. प्रियकराने चिठ्ठीत हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'जगण्याचा कंटाळा आलाय...',

point

प्रेमी युगुलाची हॉटेल रुम, दोन चिठ्ठ्या अन् मृतदेह!

Crime News : दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा फरिदाबादमधील हॉटेलमध्ये मृतदेह आढळला. प्रियकराने दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या असून, त्यापैकी एका चिठ्ठीत तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अर्ना सिंह असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती दिल्ली विद्यापीठाच्या कालिंदी महाविद्यालयात बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत होती. मंगळवारी सकाळी फरिदाबादमधील सेक्टर 37 येथील हॉटेल जॉयाच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणात तिचा प्रियकर विपिन यादव याच्यावर हत्येचा संशय असून, त्याने हॉटेलमधून निघण्यापूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. यापैकी एका चिठ्ठीत त्याने अर्नाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच स्वतःही आत्महत्या करणार असल्याचं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. 26 वर्षीय विपिन सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : नवऱ्याचा बिझनेस हडपण्यासाठी बायकोचा खतरनाक प्लॅन, रोज हळूहळू विष दिलं; पण घडलं भलतंच!

"अर्नाची हत्या केल्यानंतर मी देखील आत्महत्या करणार"

विपिनने पहिल्या चिठ्ठीत आपण आणि अर्ना गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंधात असल्याचा दावा केला आहे. जगण्याचा कंटाळा आल्याने दोघांनी मिळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं त्याने लिहिलं आहे. मात्र, त्याच चिठ्ठीत अर्नाची हत्या केल्यानंतर आपणही आत्महत्या करणार असल्याचं नमूद केलं आहे. यापूर्वी तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र प्रत्येक वेळी आपण वाचलो, असंही त्याने लिहिलं आहे. यावेळी कालव्याजवळ जाऊन आत्महत्या करणार असून, अर्नाच्या मोबाईलवर आपलं शेवटचं ठिकाण पाठवल्याचा उल्लेख त्याने केला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याने प्रत्यक्षात कोणतंही ठिकाण पाठवलं नसल्याचं समोर आलं आहे. चिठ्ठीत कालव्याचा उल्लेख असला तरी नेमकं ठिकाण सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे विपिन हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर कुठे गेला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा : Pune: मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला करणारे 'ते' 6 जण अटकेत, नावंही आली समोर!

कोणाकडून किती पैसे घ्यायचे अन् किती द्यायचे? याची चिठ्ठीत नोंद 

विपिनने लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठीत आर्थिक व्यवहारांचा तपशील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. वेगवेगळ्या व्यक्तींकडून किती पैसे घ्यायचे आहेत आणि कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, याची नोंद त्याने केली होती. या व्यवहारांमध्ये 50 हजार ते साडेतीन लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा उल्लेख आहे. यापैकी एका व्यक्तीला हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी सकाळीच एक लाख रुपये दिल्याची नोंदही या चिठ्ठीत आहे. पोलिसांनी या दोन्ही चिठ्ठ्यांची सत्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखा आणि न्यायवैद्यक पथकाने हॉटेलच्या खोलीतून पुरावे गोळा केले असून त्यांचं विश्लेषण सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विपिन आणि अर्ना सोमवारी सकाळी 9.45 ते 10 वाजण्याच्या दरम्यान हॉटेलमध्ये आले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विपिन हॉटेलमधून बाहेर पडला. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, अर्ना सोमवारी सकाळी महाविद्यालयात जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली होती. ती कुरीशेपूर गावातील रहिवासी होती. दुपारी तीन वाजेपर्यंत तिचा कुटुंबीयांशी फोनवर संपर्क होता. त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. ती घरी परतली नाही आणि फोनही लागत नसल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी धौज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर काही तासांतच सराय ख्वाजा पोलिसांनी एका तरुणीचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी हॉटेलमध्ये जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. विपिन हा अर्नाच्या घरासमोरच राहत होता. तो तिच्या कुटुंबीयांच्या परिचयाचा होता आणि त्यांच्या घरी नेहमी येत असे. अनेकदा त्याने त्यांच्या घरी जेवणही केलं होतं. त्यामुळे या प्रकरणात कुटुंबीयांच्या ओळखीतील व्यक्तीच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. सध्या पोलीस विपिनचा शोध घेत असून, सीसीटीव्ही चित्रण, मोबाईलचे ठिकाण आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.